Sunday, 1 February 2015

नाद....

रात्रीचे २वाजलेत पन आज झोपेने मात्र  उन्हाळ्याच्ची सुट्टी  मारलीय.
रात्रभर  घड्याळाची टकटक........
विचारांच वादळ शांत  पडुही देत  नाहीये
मग ब्लाँग लिहायला  घेतोय..
काल संदीपच्या शेतावर गेलो  होतो ,हल्ली  गावी दर शनिवारी  आम्ही  तेथे  जमतो
या वेळी त्याच्या  घरी  आम्हांला  antique भाला सापडला .
आता आम्हाला  आधीच  शस्त्रे  गोळा  करणे  प्रिय ..तो फिर क्या त्याचे  डीटेल dimension रेकॉर्ड अन  तो हातात घेऊन  फोटो  इ. सोपस्कार झाले.

घरी आज जणु खजिना  सापडल्याच्या आवेशात येउन थडकलोत
अन  विरमुद्रेत आई आजीला   दाखवू  लागलोत .......
पन परिणाम  विपरीत
आजीच तर भाला  बघुन पित्तच खवळल"नसते भंगार गोळा करावयाचा  नादच लागलाय म्हणे पोराला ..(टिपीकल ब्राम्हण स्टाईल मध्ये ) कुठे  तालीम करा ,कुठ बरचे तलवारी  गोळा  करा,यांनी  काय  पोट भरेल ????
गावी येउन  हे भलतेच  नाद लागलेत पोराला ...
झाल इथेही नाद हा शब्द
मराठीत
नाद हाशब्द जवळजवळ  5-6अर्थी असेल असा आपला अंदाज  परंतु  मराठवाड्यात नाद म्हटले  की व्यसनाधिनता,आधिनता किंवा  एखाद्या  गोष्टीचा आहारी  जाणे(ह्या शब्दाची  देखील  मला गंमत च वाटते  पण असो आता विषय  हा नाही )मग तो नाद कोणत्याही  असो दारु,गुटखा,मावा ,मटका ,पोरींचा इ.वाईट  अथवा व्यायाम  ,चित्र ,गाण,नाचण असे असोत या शब्दात  सर्वांची  ॕ category एकच,हाशब्द  मला सर्वात  सहनशिल सर्व समावेक आणि सुधारक  वाटला कारण  ह्याच्या लेखि सर्व छंद  वा व्यसन  सारखे
मग म्हटलं  छंद  अन  व्यसन यात फरक काय
तर विचार  केला एखाद्या गोष्टीचा  छंद  जोपासन व्यसन ठरेल
पण एखादं व्यसन कधी छंद .......
ठरेल
इथेच  मी अनुत्तरीत राहीलो.
हल्ली  बर्याच पोराच्या  गाड्यावर " अमक्याचा नाद करायचा  नाय " अस लिहुन  टेकीत गाडी  फिरवीतात.
पन नाद केला म्हणजे ?
काय
,

आता मलाच  तिन छंद  आहेत  (तसे प्रत्येकाला  काहीनाकाही असतोच )
1)पुरातन शस्त्रे  जमवणे(हा ग्रुपमध्ये  आहे)
२)पेन्सिल  स्केचेस काढणे
३)पोहणे अन व्यायाम  करणे

आता नाद केला  आम्ही  पन .........पण
तो वयानुसार असो वा वातावरणानुसार तो बदलतच गेला
लहानपणी  गोट्यांचा नाद इतका की दोन्ही खिसे भरुन शाळेत  गोट्या नेणारा आणि एक दिवस झालं अस
खिसातुन काहि गोट्या फळ्या जवळ पडल्या  आणी ही गोष्ट सर येण्याचा गोंधळॉत माझ्या लक्षात आलीच नाही  आणी मग काय सर जसे आत आले तसे धरणीला लोटांगन करते झाले.
मग काय अख्या वर्गात  हसं झाल्यावर  सरनी जो ताव माझ्यावर  काढला
तो मला गोट्या आजजरी दिसल्या तरी आठवतो
सुरपारंब्या ह्या खेळाचे देखिल असेच झाले
सुरपारंब्या !
एक नामशेष होण्याच्या सन्मार्गि लागले ला खेळ .
:-( या खेळावर पुर्ण  पोस्ट  टाकेन.;-)
यातही जेव्हा  माझ्यामुळे मित्राच्या  नको त्या  भागावर  लागले  अन त्यानंतर जे महाभारत  झाले त्यामुळे माझा हाही खेळ बंद झाला.
मग मोठेपणी
चित्र काढण्याचा अन इतिहास अभ्यासाचा नाद लागला
आसे हे नाद
बदलले
वयाबरोबर
काळाबरोबर
मित्रांबरोबर
एवढे  मात्र  नक्की  ठेवून गेले गोड आठवणी

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...