Sunday, 24 April 2016

गेलीस...

सोडलास हात जेवा
गेलीस निघुन अशी
बोलवलं ही असत परत
पण वाटलं वेळ गेली होती
रंगलो होतो सुखस्वप्नात
बागडत होतो स्व छंदात
मोडुन सुखाची झोप अशी ही
गेलीस निघुन अशी
बनुन कल्पनेच फुलपाखरु
विहरत होतो फुलबागात
प्रेमफुलाचे पराग वेचित
का रमलो होतो स्वविश्वात
तु बाग मोडीली कल्पनेची
फुले तोडीली भावनांची
तरीही  राग न भरता विचारतो
का गेलीस निघुन अशी
बोलावलं ही असत परत
पण
वेळ गेली होती?
रावण

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...