भेटते तु मला भेटते रातीचे
चांदणे हे जसे रोज ह्या अंगणी
अंगणास भेटुनी चांदणे रोज ही
भेट ती पुर्ण ही होते का सांग ना
भेटते तु मला भेटते गगन हे
क्षितिज हे भासते भेटता धरणी
क्षितीजावरी भेटुनी रोज नभधरणी
भेट ती पुर्ण ही होते का सांग ना
बाजी©
Saturday, 11 May 2019
भेटते तु मला
Friday, 10 May 2019
तीच वाट ती
वाट तीच तरी अनोळखी होऊन,
आज लुटताना पाहीली
एक कविता लिहुन हातांनी,
आज मिटताना पाहीली
माझ्या अंगणीची ,माझीच बाग
बेनाम झाली कधी ,
माझ्याच मनसाखळीची
कडी आज तुटताना पाहीली
हक्काची चांदरात कधीची ,
सुन्नपणे संपताना पाहीली
माझ्याच हृद्प्राजक्ताची फुले
निर्गंधपणे झडताना पाहीली
माझ्याच हृदयाचे माझेच डोळे
आज पाणावले कधी ,
आपलीच सावली परकी होताना,
मि स्तब्धपणे पाहीली
Baaji
baaji
Subscribe to:
Posts (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
मी उरतोच कोठे ? तुज्यावीणा .... शुन्य शुन्य आणी शुन्य .. मी सनकी वाटतो नं तुला , कधीकधी वाट्टेल ते बोलतो , आणी तुला त्रास देतो पर...
-
धीरा आदीवीरा अनंता तु भयंकरा त्रीनेत्रा शशिधरा हे सत्यरुप शिवसुंदरा निळकंठा उमापती नमो तुवा हरीप्रियकरा दे शक्ती मज आदीभैरवा हे सत्यरुप श...
-
मी कधी, तुझ्या सोबती , कधी गुंतलो ,कळे ना मला तू कधी ,पुन्हा तू कधी,कधी भेटसी , मला सांग ना आभास तू ,का जाहली , स्वप्नात माझ्या,तू ये ना जर...