Sunday, 2 April 2017

शिवराजभुषण

देवल गिरावते फिरावते निसान अली
ऐसे लबके राव राने सबकी गये लबकी
गौरा गणपती आये औरन को देत ताप
अपनी ही बारी सब मारी गये दबकी
पिरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत
सिद्ध कि सिखाई गई बात रही रबकी
कासीहु की कला जाती मथुरा मस्जिद होती
सिवाजी न होतो तो सुनत होती सबकी..।।20||

कवी भुषण
शिवबावनी
अर्थ
..देवळ तोडत निघालेल्या औरंगजेब अलीचे निशान
पाहुन सर्व रावराणे पळुन जात आहेत
गौरगणपती भक्तांना तर दंड देतात परंतु मंदीरावरच मुसलमानांचे घण पडत असताना कोणास ठाउक कोठे गेले आहेत
हिंदु सिद्धपुरुषांची सिद्धी का कापुराप्रमाणे जळाली की चहु कडे सर्व पीर पैगंबर आणी नंगे फकिरच दिसु लागलेत
हे #राजा_शिवाजी तु महान आहेस
  जर तु  नसतास तर
काशी कलाहीन असती आणी मथुरा मश्स्जिद जाहली असती
आणी आम्हा हिंदुंची तर सुनत(खतना)झाली असती .

2.
कुंद कहा पय वृंद कहा अरु चंद कहा सरजा जस आगे
भुषन भानु कृसान कहाब खुमान प्रताप महीतन पागे
राम कहा द्विजराम कहा बलराम कहा रण मे अनुरागे
बाज कहा मृगराज कहा अति साहस मे सिवराज के आगे  ||51||
 
कवी भुषण
शिवराज भुषण

अर्थ
कोठे तो पयोवृंद कोठे तो कुंद कोठे आणी कुठे चंद्र शिवसर्जा पुढे
की हा सुर्य की अग्नी हेच कोडे पडावे प्रतापाकडे पाहुन
कोठे राम कोठे परशुराम तर कोठे बलराम युद्धानुरांगांतरी
साहस असे कि ते ससाणा असो सिंह दोघातही इतके आहे !
तु शिवराजा खरोखर अलौकिक आहेस

3. महाराजांचे दानधर्म वर्णन करताना कविराज भुषण

सही तनै सरजा तही द्वार  प्रतीछिन्न दान कि दुदुंभी बाजे
भुषण भिच्छुक भिरण को अती भौजहुते बडी मौजनी साजे
राजन को गनै ! राजन को गनै ? सहीन मै न इती छबी छाजै
आजु गरीब नेवाज मही परतो सो तुही सिवराज बिराजै !

अर्थात
हे शिवाजीराजा तुझ्या गृह्न्मंदीरी दररोज दानासाठी दुदुंभी वाजते
तुझ्या इथे सदा भोजनादी दानाने तृप्त झालेले याचक नेहमीच दिसतात
राजा राजा म्हणुन तु का न कोणी गणावे की असे दातृत्व आहे कोण्या पातशहा कडे
क्षोणीत अश्या पृथ्वीवर दयाळा तुजसम दाता ए तुच असे !

   
अथ अपन्हुति अलंकार वर्णनं
चमकती चपला न फेरत फिरंगै भट इंद्र की न चाप रूप बैरख समाज कौ |
धाए धुरवा न छाए धूरी के पटल मेघ गजिबौ न साजिबौ है दंदुभी आवाज कौ |
भ्वैसिला के डरन डरानी रिपुरानी कहै पिय भजौ देखि उदौ पावस की साज कौ |
घन की घटा न गजघटनि सनाह साज भूषण भनत आयौ सैन सिवराज कौ ||
:- कविराज भूषण
अर्थ :-
ही चमकणारी चपला(विज) नव्हे. या विरांच्या सळसळणा-या तलवारी आहेत. हे इंद्राचे धन्युष्य नव्हे, हा तर सैन्याचा झेंडा आहे. हे ढग नाहीत. ही तर सैन्याच्या हालचालीमुळे उठलेली धूळ आहे. ही मेघ गर्जना नाही. हा रणवाद्यांचा घोष आहे. तो मेघसमुदाय नाही, तर कवचांनी सिध्द झालेले हत्ती आहेत. शिवरायांच्या या भिषण रणघोषाने भेदरलेल्या शत्रुस्त्रिया आपल्या सख्यांना म्हणत आहेत की, ही पावसाची चिन्हे नाहीत. ही तर शिवाजीच्या सैन्याचा हल्ला यावयाची चिन्हे आहेत.

साजि चतुरंग बीररंग में तुरंग चढ़ि।
सरजा सिवाजी जंग जीतन चलत है॥
भूषन भनत नाद विहद नगारन के।
नदी नद मद गैबरन के रलत हैं॥
ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल,
गाजन की ठेल-पेल सैल उसलत हैं।
तारा सों तरनि घूरि धरा में लगत जिम,
धारा पर पारा पारावार ज्यों हलत हैं॥ --

सजुन धजुन दिमाखदार अश्वारुढ सेना घेऊन सर्वशिरोमनी (सरेजाह)
शिवाजी युद्ध जिंकण्याकरिता निघालेला आहे
भुषण म्हणतो नगार्याचा अवाज मोठमोठ्याने होत आहे
मत्त हत्तींच्या मतिष्कातुन मदप्रवाह नदीसारखा वाहत आहे
रस्त्याने कोलाहल करित चाललेल्या सैन्यामुळे सगळीकडे खळबळ
माजलेली दिसते
महाकाय हत्तीदलापुढे पर्वत पर्वतासन देखील उखडले जात आहेत
शिवाजीच्या प्रबळ सेनेमुळे असमंतात उठलेल्या धुळीने सुर्य ही झाकला आहे
तसेच या प्रचंड सेनेच्या चालण्याने समुद्द देखील हलत आहेत

3.उंचे घोर मंदर के अंदर के रहन वारी
    उंचे घोर मंदर के अंदर रहाती है
    कंद मुल भोग करे कंद मुल भोग करे
तीनि बेर खाती सो तीनि बेर खाती है
भुषण सिथिल अंग भुषण सिथिल अंग
बिजन डुलाती तेब बिजन डुलाती है
भुषण भनत 'सिवराज'वीर तेरे त्रास
नगन जडाती ते नगन जडाती है

अर्थ
ज्या स्त्रिया पुर्वी महालांमध्ये राहत होत्या
त्या आता पर्वतांच्या गुफेत राहत आहेत
ज्या स्त्रिया पुर्वी मिष्टान्न खात त्याना आता
कंद मुळावर समाधान मानाव लागत आहे
ज्या तिन वेळ खात असत त्याना आता
तीन बोरे मिळणे ही महाग झालेले आहे
पुर्वि अभुषणांनी पुर्वी जे शरिर जड होत  त्यांचे शरिर भुकेने शिथील झालेले आहे
ज्या पुर्वी भरपुर आप्तेष्ठांसोबत राहत त्याना आता वनवास प्राप्त झालेला
आहे भुषण म्हणतो हे शिवाजीराजा तु मिळविलेल्या शत्रुवरील विजयामुळे शत्रुस्रियांची इतकी वाईट अवस्था झालेली आहै कि त्या अंगवस्त्रासही महाग झालेल्या आहेत .

अनुप्रास अलंकार
शिवबावनी

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...