Saturday 14 January 2023

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला 
खणाणल्या समशेरी
महाभारतासम रण दिसले
कुरुक्षेत्राची भुमी
भाऊ सदाशिव रणात तांडव
काळाग्निसम करीत भिडले
शिंद्याचे रण भैरव कंदन 
म्लेंच्छावर जणु तुफान उठले 
यौवन शोर्या गाजवित तो
सुर्य मंडळा भेदत पडले
अभिमन्यू विश्वास जनकोजी 
मृत्यू ला ही मारत लढले
देश रक्षणा मर्हाट भाला
पठाण छेदून तुटून गेला 
भारत भूमी साठी मराठा
शंभर कापत कटून गेला 
पानिपत ते एकच काय
अशा आहुत्या लक्ष करु
हरलो जरी हि रणांगणी

बाजी राधाकृष्ण पांडव copyright 

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...