आरे प्रसाद
आरे प्रसाद!
तु विनुला पाहीलस का रे ? हापाहापत्या स्वारात रवी विचारत होता!
आत्ताच तर इथ होता ! कुठे गेला कुणास ठाऊक !
खांदे उडवत प्रसादने सांगीतलं !
तो बघ तिकडे बसलाय त्या ब्लॅक जर्सीवाल्या ग्रुपजवळ .
असे सौरभ जोरात ओरडुन सांगतो तो
रवी त्या दिशेने तात्काळ पळत जातो.पुर्ण शरीर घामाने डबडबलेल ,केस practice ने विस्कटलेले अश्या अवस्थेत तो त्या ग्रुपजवळ जाऊ लागतो
तर त्याला एक वेगळाच ग्रुप दिसत असतो ओळखीचा तर नाही पण विनु बसलाय म्हणजे काहीतरी असणार म्हणुन तो जोरात तिथे जात असतो पण
विनु त्याला येताना बघतो अन झटकन वीज चमकावी अन माणसाने सावध व्हावे!
तसे उठुन सामोरं जातो !
रवीला भेटताच विचारतो
अरे बाबा ते 100मीटर च्या रेस cancel झालत्याना तर
बसलो होतो गप्पा मारत थोडा
पण तुला काय झाल इतक घामाघुम झालायस
खुप पळलास का?
इतक बोलल्यावर रवीला काय बोलु हेच कळणा त्याच्या लक्षात येत होत की काहीतरी बदल.
बदल झालाय !
विनय मधे
पण तरिही मनातील ही शंका सोडुन ही तो ऊत्सुकता आळवुन म्हणाला
हे बघ ,
काय आहे तुझ्यासाठी ते आत्ताच कळाली बातमी !
काय आहे बघु ?
तो थोडासा खौडकर मुलासारखा तो मागे लपवत रवी म्हणाला
पण आधी पार्टी देणार असलास
तरचं सांगतो भो
येवढा घामाघुम झालोय तुझ्यामागे पळुन पळुन बोल देतो की नाई !
आरे यार तु भी क्या याद रखेगा चल कँटीनला ! खांदे उडवत विनु उत्सुकतेने म्हणाला
च्यायला काय चिंगुस आहेस रे तु! रवी म्हणाला
ते काय आहे विनु आपण ना लहानपणापासून सोबत आहोत !
तुला म्हणुन सांगतो की आपण दुर आहोत म्हणुन आपले पालक आपल्याला पैसे पाठवतात
एकवेळ ते स्वतःस काइ घेत नसतात पण आधी पैसे पाठवत असतात
असे पैसे आपल्याला वापरण्याचा निश्चितच अधिकार क्रमप्राप्त आहे .
पण जर आपण ते अनाठायी करणार असुत तर
तस वागन हा घरच्यांचा विश्वासघात होतो
आणी मी अजुन तरी कुणाचा विश्वास घात नाही केलेला.
तेवा मी माझ्या उडी एवढाच अंगण ठरवित असतो!
भले ही कोणाला मी विचित्र वाटो !
जय हो बाबा विनय दास की !
बाबा आपल्या भावना पोचल्या बरं
इणी हे आपल कँटीन आलेलं आहे!
चल दोन चहा आणी सोबत दोन प्लेट भजी पण मागवं
यार जाम भुक लागलीय रे आणी आता तर हे बघ साडेपाच वाजलेत !
मग विषय बदलवित विनुला म्हणतो
हा तर काय म्हणत होतास विनय तु
विनु चकीत होऊन !
काय ?
रवी यार लाजतोस काय रे माहीतेय मला
तु बोल यार !
विनु तर पार बुचकळ्यात पडतो
अरे पण मी का लाजु लाजायला काय मी काय हे वाटलो का!
तसा तु निर्लजच आहेस काय !
विनुच बोलण मधेच तोडत खोडी काढत रवी म्हणतो
हा तर मग त्यात काय
निर्लज्जम् सदा सुखी
माहीत नाही का !
अस बोलुन एकमेकांना टाळ्या देऊन हसत असतात तोवर अॉर्डर येते
हा तर मग मला काय दाखवणार होतास सांग !
थोडा सब्र तो कर यार !
हे बग रवी आताअतीच करायला राव तु !
हो का बरं
बर दाखवतो पण मला सहा महीन्यापुर्वी
मी प्रेमात पडणे शक्यच नाही अस कोणीतरी म्हटल होतं आठवतय का रे!
चोर पकडावा तसा काहीसा भाव विनुच्या चेहऱ्यावर येतो!
तरी आव आणुन
आआ म्हणलं असेल कोणी मग काय त्यात एवढे
काळ बदलाचा कर्ता आहे माहीत नाही का!
हो माहीतेय पण काळाहुन बलवान असा कर्ता असतो जो कधी कधी
कित्येकाना कित्येकदा आपली तत्व बदलण्यास भाग पाडतो !
आपला स्वभाव आपला स्वाभिमान सगळ सगळ लवचिक बनवतो अगदी रबरा सारख
हे तो इथे असतो
छातीकडे हात ठेवुन म्हणतो!
हे हृदय परिवर्तनाचं मुळ आहे रे
काय म्हणतो!
बरं झाल तुझं प्रवचन
तर आता सांगशील का बरं ?
अरे मला एक वही सापडली
त्यात तु म्हटलास ना प्रेम काय असतं ते
बघ अजुन ही असे वेडे आहेत
चुकीच बोलल्यासारख करुनन सॉरी "होते"
पण काय रे ह्यात बोल ना !
सांगतो ना !
ही आहे एक अव्यक्त प्रेमगाथा !
जी फक्त व्यक्त न करण्यामुळे अपुर्ण राहीली.......
एवढे बोलतं तो डायरीचं पान उघडतो !
पहील्या पानावर एका मुलीचा फोटो
असतो ,
कसली भारीय राव
बहुधा ही तीच असावी ! असे शब्द आपोआप रवीच्या तोंडुन निघाले !
पण त्याचा फोटो कुठयं !
म्हणुन दुसरं पानं उघडतो तीथे काही ओळी लिहीलेल्या असतात!
"कदाचित तुम्हाला वाटेल
माझं आयुष्य भ्रमराप्रमाणे आभासी सुखासाठी व्यर्थ केलं !
मृगृजळ असणार्या गोष्टीपायी उधळलं
कदाचित मी तिला विसरलो ही असतो पण
खर तर मी तो सल उरात ठेऊन जगुचं शकलो नसतो !
आयुष्यात मागे वळुन बघताना
कळाले...
की तिच्यावर प्रेम करताना कधी प्रश्न नवताच
ति सोडुन जाइन न जाईन
आणी ,गेलीच तर जगु शकेन मी !
कधी ही विचारच नाही केला की
माझ्या भावनांचा स्विकार करेल ती ?
..
कि कधी तीला
माझ्या खर्या भावना तरी कळतील ?
की ती देखील मला ईतरांप्रमाणे उडते पाखरु समजेल ...जेव्हा की माझी तयारी तिच्यात भुंग्या प्रमाणे गुरफटून मरण्याची देखील होती ,.....
पण खरं तर माझं आयुष्य मी भ्रमराप्रमाणे ही जगु शकलो नाही तो निदान आपल्या प्रिय फुलाचा मकरंद तरी मिळवतो त्याच्या भावनांना वाट तरी देतो!
मि ते ही करु शकलो नाही!
निश्चीतच असा विचार नवताच केला ती काय उत्तर देइल याचा ?
,
प्रेमात दरवेळी ति हो म्हणावीच अस नसत
अन नेहमी प्रेमकथेनं पुर्ण व्हावं असही नसत ....
कारण अर्धवट राहीलेल प्रेमच पुढे जगण्यासाठीच कारण असत
की कुठेतरी ती भेटेल यासाठी मन जगास निरखत असतं !
शेवटी प्रेमाच्या त्या यमदुतास हवा असतो त्याग आणी समर्पण .....
जे होतं ,आहे आणी पुढेही तिच्यासाठी होणार असतं !!
तुमचाच मित्र ,
सुहास
हे वाचल्यावर मात्र दोघांची उत्सुकता वाढली
रवी हळुच बोटानी पान उलटलं त्यावर सुंदर हस्ताक्षरात
लिहीलेल होत तो वाचु लागला!
तारिख नाही आठवत पण तो कॉलेजचा पहीला दिवस होता मी तसा शहरात नवीन कदाचित येथील वातावरणास
अनभिद्न
गेट मधुन सावकाश पाउले टाकत फाउंटन जवळ येउन थबकलो.
काही टवाळ senior नी मला अडवले होतो.बहुधा रँगिंग करण्याच्या विचारात ते होते
नवीनच आहेस नां!? एक दरडावलेला अवाज.
उत्तर काहिच नाहीच नाही मी अजुन ही जमीनीकडेच बघत होतो.
हं.,,,,.,,,हलकासा अवाज आला!! काय नाव रे बेण्या तुझं !
काय ! तो म्हणाला
आरं नाव इचारल पावट्या ,
सु सु सुहास....
मग सरळ सांग ना सांग न
सुहास .....सुसु सुहास काय लावय हे ?
अपमान केलास तु आमचा प्रश्नाच उत्तर नीट न देऊन
कळल काय !
मम मी अपमान ? गोंधळुन सुहास म्हणाला
मग काय आरती केलीस व्हय रे ?
लई झाली chatting
आता action scene
चल आम्ही सांगतो ते कर
अं......... तो म्हणाला
ऐकु येत नाही का!! पुन्हा तोच अवाज
सांगा ना!! तो म्हणाला
त्याला हा प्रकार नवीनच होता
पण नजर अजुनही खालीच होती
शेजारुनच एक मुलींचा ग्रुप चाललेला असतो
त्यातील यशुचे लक्ष बहुधा ह्याप्रकारॉवर पडते
तीला लक्षात येते नक्की काय चाललय ते
ती मुळातच बिंधास्त स्वभावाची अन तितकिच मनाने चांगली
ति आपला ग्रुप घेउन तिकडे वळते
काय कॉलेजच्या सडक्या कांद्यानो
लाजा काय वेशीला टांगल्या हो रे !!!
एक मोठा खडा अवाज घुमतो
सर्व आश्चर्याने बघु लागतात
काय!
एक टवाळखोर म्हणतो.
लाज नाही वाटत ,स्वतःला senior म्हणावता आणि नवीन आलेल्याना त्रास देता
तुम्हाला ना शेवटची warning हा बेट्या हो
सोडा त्याला !
कोण ग तु कारटे!! दुसरा टवाळखोर
थांब थोड मी कोण ते माझा भाऊच सांगल !
बोलवतेच आता थांब !
बोलव बोलव
ते काय आमदार आहे व्हय
हाहाहा
एक टवाळखोर मधेच म्हणाला.
आठवतोय
मागच्या आठवड्यातला चौकात पोलिसाचा मार !
ते खाणारे तुम्हीच ना रे !
सगळे चुप्प !
तो PI माझाच भाउ ,, बोलवु पुन्हा !!
हो रे बोल की आता
ततततततोतो तुझा भाऊ !!!!
त्यामुलांची बोबडीच वळली
सससस सॉरी ..
इतकेच बोलुन ते पटकन निघुनही गेले
तोपर्यंत मी फक्त डोळे विस्फारुन बघत होतो...........तोच कॉलेज सुरु झाले.तेवा मि काहीसा भानावर आलो....
ते ति माझ्याजवळ आली ,
आणी म्हणाली
कुठलूया फँकल्टीला आहेस रे!
b.sc chemistry
मि घाबरत घाबरत बोललो !
अरे मग घाबरतोस काय !
हे बघ मी पण नवीनच आहे ना !
हेय तु इथला नाहीस का !
नाही
मी एवढेच बोललो
जाउ दे घाबरु नको !
काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला सांग !
काय चल येते अस म्हणत ती ग्रुपकडे जाते पण लगेच का कुणास ठाऊक परतते
आरे हो !
विसरलेच रे
मी यशांजली ! निकनेम यशु
आणी तु
सुहास !
छान भेटु पुन्हा चल बाय! म्हणत ती घाई घाई ग्रुपकडे गेली सुद्धा तिचा ग्रुपदेखील जो इतकावेळ गप्पा मारत थांबला होता हळुहळु पुढे सरकत गेला अन शेवटी लहानसा ठिपका बनुन नजरेआड झाला !
पण ती भेट मात्र कायमची लक्षात बसली अगदी जणु त्या ठिपक्याचा व्रण मनावर व्हावा तशी!
ती पहीली भेट!
चल चल पटकन पान उलटं !
आता विनुची उत्सुकता चाळवली गेली पण तोपर्यंत चहा आणी भजी संपली होती म्हणुन मग रवी विनुची इच्छा नसतानाही डायरी बंद करुन उठतो
चला राजे उर्वरीत भाग घरी गेल्यावर हा!
ये यार अस असत का राव !
विनु जरा कथा ऐकायला जास्तच excited झालेलाअसतो
पण रवी काही एक न ऐकता कँटीन बाहेर जवळ जवळ पळतोच
त्याला पकडण्याचा प्रयत्न करायला विनय पण पळतो
आरे थांब थांब ! च्यायला काय मुड खराब केलास राव !
आस म्हणत तो खोटंखोट पाठलाग करत आसतो
तो रवी
गेट मधुन बाहेर पडुन रस्ता क्रॉस करत आसतो !
विनु गेट जवळ येतो तो त्याला विचित्र दृश्य दिसत
रवी एका स्कूटीला धडकता धडकता वाचुन पाय सटकुन खाली बसलेला असतो ,मम
वही रस्त्याच्या एकाकडेला पडलेली असते ,
आणी तो मुर्खासारखा स्कुटीवाल्या मुलीकडं बघत असतो
विनुला विचित्र वाटत ती मुलगीही याच्याकड बघुन हसत असते
का कुणास ठाऊक जणु या आधी ते एकमेकांना ओळखात होते ?
पण हा सगळा विचार सोडुन विनु त्याच्याकड बघुन फिदी फीदी हसायला लागला !
साल्या तुला एक मिनीट एकट काय सोडल तु तर मरणाच्या दारातच येऊन टेकलास की रे!
कायम सोडून गेलो तर काय होईल , येडं कुठलं !
आणी पुन्हा हसला ,
रवी सावरुन उठला त्या मुलीला काही न बोलता फक्त हसला आणी मग विनुनी आधार देत ,
हात खांद्यावर घेऊन त्याला रुमवर नेल !
जाताना तो ही त्या मुलीकड पाहत होता ती भेट हृदयात साठवत होता ,
का कुणास ठाऊक विनुला प्रश्न पडला
ही तीची आणी त्याची पहीली भेट होती ?
मनानं उत्तर दिलं ......नाही निश्चितच नाही रे!
No comments:
Post a Comment