मान्य आहे मनुस्मृतीत जातीवादाचा पुरस्कार करुन हिंदुधर्माची हानी झाली
त्यास गढुळता आली परंतु सर्वच पुराणांना अशी भेदात्मकता निश्चितच मान्य नाही याउपर भविष्यपुराणाने पुढील श्लोकात क्रांतिकारक विचार (तत्कालाधारेन) प्रतिपादीत केलेला दिसतो .
चत्वार एकस्य पितुः सुताश्च।तेषां सुतानां खलु जातीरेका ।एवं प्रजानां पितेक एव पित्रैक एव नच जातीभेद !
भविष्यपुराण अध्याय ४२
एकाच पित्याची चार मुले जशी एकाच जातीची असतात .
तशीच एकाच विश्वनिर्मात्यापासुन निर्माण झालेली ही प्रजा जातीभेदात्मक कशी असु शकेल !
शेवटी आपण सर्व
हिंदवा सोदरा सर्वे न हिंदु पतितो भवेत
मम दिक्षा हिंदु रक्षा मम मंत्र समानता ।
बाजीराव©