Wednesday 16 March 2016

मि पुत्र भारतीचा

जिंकतो जाऊनी यमासही
मी पुत्र भारतीचा
लावितो आग नाचतो तयात
मि पुत्र भारतीचा
अहो शत्रुनो जरी
तुम्ही बलवान आहात खरे
धैर्य गरुडासम चाल
सिहासम दावुनी जिरवितो ,
मि पुत्र भारतीचा !
जयिष्णु विरवृत्तीचे जन्मता
पाइक हो आम्ही!
वंदुनी नरसिंह कृष्ण  भार्गवा
सवे चापपाणी
शत्रुंजय मि मृत्युंजय मी
अघोर रुद्र शिवाचा
लावितो आग नाचतो तयात मि
पुत्र भारतीचा !
अखंड शांती सत्यहिंसेचे
साधक जरी आम्ही!
करुत हिंसा राष्ट्रास्तव
जर वेळ पडेल वाकडी
ध्यान लावुनी ओंकारात ,
जरी पाहतो ब्रम्हांडात
तरी पडु न कमी कधीच आम्ही 
आपल्या राष्ट्र हितात
घात करण्यासी धजेल कोणी
करु चौरंग क्षणी तयाचा
आग लावितो  रणात
नाचतो तयात मि पुत्र भारतीचा !

बाजीराव©

बाजीराव पांडव©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...