Friday, 31 March 2017

ये विन्या वाच की पुढे ,
   थांब ना थोडस !
......विनु रवीचा उतावळेपणा बघुन चिडला
जरा टाईम बघा काय झालाय ते कॉलेज ला कोण जाईन आपला बाप
       

Wednesday, 29 March 2017

ये परतुनी ...भाग ५ विचित्र स्वन

ते दृश्य ओळखीचे होते असे वाटत होते ,कुठेतरी घडलेल आहे हे !
   हो का ? अरे ती बघ इकडेच बघतेय तुझ्याकडे !
   छे रे तुझ आपल काहीतरीच मुली ना थोडी अशा बघतात मुलाकडे !
अरे हो तुझ्याकडेच बघतेय ,
बघ बघ ती हळुच हसतेय देखील
        बघ ना हसताना तिचे डोळे देखील स्मितपणे हसतायेत नं  ,
  काय उपमा द्यावी बरे ,
अरे हरिणी सारखे अर्थातच ...
..............हो मृगनयनीच ती नाही का !
तीच्या जवळ जात होतो आणी ओठांनी गुणगुणत होतो

कवी कल्पिताकर्ण धनुसम तनु .......
            पाहता कि गुलाबी गाल तुझे
कुसुमलयांकित कुंतल हे जणु....
           ..... गर्दरानीचे तृणच ते
कलिकेसम हे ओठ जणु की....
            ... मधुरस भरले कुंभ च ते
शरसम नाजुक नासिका ..
               ... ती तुझी
मज मोहवती तव
.............. रुप अनुपम
वेड लावती मृगनयनच हे..........

ति तुझीच तर वाट पाहतेय जा तिज जवळ तर जा !
नको रे !
  आरे काय नको मुर्खा ,तुला हवीय न ती ,
...तुझ्या आयुष्यात ,
           तुझ्या  सुखात साथीला , तुझ्या दुःखात हाती ला !
नकोय का ? बोल !
आरे पण .....
पण काय , तुला ती हवी आहे अथवा नाही बोल !
हो हो अलबत मला हवीय जातो ना मि ,निघालो
    मि निघालो ,तिच्यासमोर  अगदी, समोर जावुन उभा होतो !
    विश्वास ?   विश्वास नव्हता वाटत ,तिने मला बोलावल म्हणुन
तरी हिंमत केली ....मि गेलो
जाताना तिचे लुकलुकणारे डोळे मला खुप जास्त आकर्षित करु लागले होते

    हरिणीप्रमाणे
   खरेच हरिणी प्रमाणै भासत होते

काही क्षण निशब्दतेत गेले
आणी अचानक तिच्या डोळ्यातील भाव बदलले
त्यातील समुद्राची शांतता जावुन वादळाची गंभीरता जाणवु लागली होती
    तिच्या चेहर्यावरील स्मित अचानक उडुन गेले होते ,
हृदयाची स्पंदने तीव्रगतीने मला जाणवु लागली होती , हात थरथरत होते
आणी ती जणु सांगत होती मला बोल !
...तु बोल ,,
अरे बोल ....मनातलं हीचवेळ ती !
परंतु मि निशब्द !

ती स्पंदने कंपनात बदलत होती त्यांची गती अधिक वाढत होती,
...त्यामुळेच की काय हवेत उष्णता जाणवु लागली परंतु इतके होऊन ही तिच्या कपाळा घामाचा ठिपका ही नवता !
वातावरण तप्त होत होते
  ती नजरेनेच सांगत होती बोल बोल बोल बोल
परःतु मि बोलत नवतो
.......काय बोलणार ,मती कुंठीत,विचार खुंटीत आणी भावना गोठल्यावर मि काय बोलणार होतो
प्रयत्न करावा तरी शब्द न स्फुरावे ऐसे द्वंद्व मनी माजले बहु
शेवटी ती कौल देत राहीली आणी अचानक अचानक नाही....शी झाली
कशी ..गेली  
...कुठे गेली ....
..केवा गेली..
काहीच कळेना आणी मागुन इतक्यात मोठा अवाज झाला परंतु तो कशाचा हे कळण्या आगोदर ....

मि जवळ जवळ किंचाळत उठलो ...पंख्याखाली झोपुनही माझे आंग घामाने डबडबलेले होते आणी मि
अंथरुणात होतो
...तर है स्वप्न होते ,,,.परंतु हे कसले विचित्र स्वप्न म्हणायचे !  

आणी तो मला तीच्या जवळ जाउन बोलणारा कोण होता !
  मि आठवु लागलो परंतु एव्हाना स्मृती पुसट होत चालल्या होत्या ,तरी मि आठवत होतो परंतु स्मृती पटलावर दिसत होता चेहरा नसलेला माणुस जो मला
जा आरे जा
   बोल तु...
बोल म्हणुन कळवळ्याने सांगत होता आवाज तर ओळखीचा होता परंतु कोणत्याही इर परिचितांपैकी कोणाचाही नाही मग.....??????

मि शांत झालो आणी डोक्यात विचार आला ,
....तो तुझाच अवाज होता !
,......तो तुच होता ...तुझ अंतर्मन तुझ मनातील द्वंद्व
ते ते तुला सांगत होत
सावध करत होतं ......जस आता चालुय तुझ्यामनात फरक हाच
कि
....तेथे समोरासमोर होतं 
परंतु अस कस शक्यय
...का नाही ?
स्वप्नय ते !
असेलही स्वप्न मग ?
अरे परंतु काही स्वप्न ही आपल्याला भविष्याबद्दलआधीच आगावु सुचना असते
फक्त त्याचा अर्थ समज !

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...