Thursday 11 January 2018

बालपणातुन तारुण्यात डोकावताना

बालपणातुन तारुण्यात पदार्पण केल की
आईवडीलांच्या नियमात राहण म्हणजे जाच वाटु लागतो
त्यानी काहीही सांगु नये  मला अथवा माझ्या निर्णयात काही बोलुच नये अश्या प्रकारची एक मानसिकता असते !
आणी मनास स्वतंत्र्य आस्तीत्वाची ओढ
लागते
तो निसर्गनियमच आहे ,
पंखात बळ आल की घरटे सोडायची पाखराना ओढ असते आणी
अंगात बळ आल की छाव्याना वाघिणीची गुहा परकी वाटु लागते
यात वेगळ काही नसतं !
परंतु या तारुण्यमदात लक्षात येत नाही अनुभव अजुन गाठीशी नाही.
कळत नाही आपल्याला आपली झेपावण्याची सध्याची क्षमता काय आहे ?
किती भार अंगावर घेण्यास समर्थ झालेले आहेत बाहु ?
आणी बाहेर पढतो बोथट धारीच्या तलवारी घेऊन जगाशी लढायला
रणांगणाचा अनुभव नसतो ना  शत्रुचे बला ची तीव्रता फक्त आत्मविश्वासाची तुकडी  असते सोबत
त्या एका तुकडीच्या विश्वासावर काही काळ चालते रण परंतु जेव्हा
ही आत्मविश्वासाची तुकडीच घायाळ होते तेव्हा तो हताश होतो ,जीवन कठीण वाटु लागतं आणी
   वडीलधार्यांचे त्यांच्या अनुभवांचे मुल्य कळते ,पटते.
कारण
पिल्लांना मोठं झाल्यावर जरी आपल्या पंखावर विश्वास येत असला तरी चिमणीस माहीती असते की
त्यांच्यासाठी आभाळ अजुन ओळखीचे नाही म्हणुन !

बाजी©
९-०१-२०१८

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...