Saturday, 24 March 2018

जंगल


जंगल हो जंगलच ते बालपणापासुन आयुष्याची सुरुवात होऊन आता एकविस वर्षापर्यंत पुढे आल्यावर जाणवु लागते की जे सगळे करतात तो तेच आपण ही करु लागलो आहोत तर ,ज्याचा कधी विचारही केला नसावा की
पुर्ण जग ज्या जात्यात दळले जात आहे, आपण ही त्यातच पडतो आहोत तर अखेर .
बालपणीच सुरु झालेला हा प्रवास परंतु तेव्हा आजुबाजुने मैदान होते अगदी खुले खुले स्वच्छंद फिरण्यासाठी, उस्फुर्त कल्पनांच्या भरारी साठी  आकाश मोकळे होते ,स्वच्छंद फिरण्याकरिता मला मैदान मोकळे होते
आणी आणी मुक्त स्वप्नांसाठी मनाचे दोर मोकळे होते
मी मोठा होत गेलो काळाच्या चाकाच्या गडगडाटासोबतच मैदानातुन गवताळ मैदानात उतरलो नतर झुडुपांच्या वनात आणी सरते शेवटी या जंगलात येऊन पोचलो
जंगल हो जंगलच आहे की हे ,         ....
स्वार्थासाठी एकमेकांचे लचके तोडुन खाणारे अनेक अनेक हिंस्र पशु  येथे मानसाच्या कातडीआड दिसतील ,स्वतःच्या ताकतीने दुर्बलाना पायाखाली चिरडणारे गर्विष्ठ बलवान पशु ही दिसतील आणि दिसतील मुर्दाड मनाने अन्याय सहन करणारे गुलाम ही ,
या शहरांच्या झगमगाटाआडच्या भिषण काळोखापुढे तरी जंगलातील अंधार कमी ठरतो ,
पुढे जाताना तेथे पाय आडविणारा आधार तरी देतो ,या शहरी जंगलात पाय अडविणार्याकडे ही क्षमता कसली ,
आम्ही क्रुरतेस रानटीपणा म्हणतो खरे परंतु हा रानटीपणा या शहरी जंगलात जास्त आहे ,
जंगलतर जन्मतः सुसंस्कृत आहे सगळे काही नियमाने चाललेले ,
सगळे काही अगदी शिस्तीत ,याबाबतीत मला नेहमी ते जग माझ्या जगास वाकुल्या दाखविताना दिसते ,
की अरे बाबा ,मि जे निर्माण करतो त्याला विघटीत कण्याची ताकत ठेवतो ही
गोष्ट तुम्ही करु शकता का
नाही नं मग ,वाटते  हे शहरी जंगल तर अधिक भिषण आहे ,

माणसांच्या गर्दीत राहुनही माणसे  एकटी आहेत ,
उडणार्या अकांक्षांना येथे कसलेसे बंध आहेत
पाय ओढून अडखळविणारे हात आपलेच आहेत
तोडुन लचके गिळणारे दात आपल्यांचेच आहेत
बेसावधवेळी दंशणारे साप ही आपलेच आहेत
वर मंत्रुन विष चढविणारे ओठ ही आपलेच आहेत
मनाच्याही मनात प्रत्येकाच्या कसलेसे द्वंद्व आहे ,
इच्छांना येथे कुठली अशी अनामिक  ओढ आहे
,त्या मागेच हे मन गुप्तहेर आहे,
चेहरे हसणारे आत रडणारे मन हजार आहेत
भावनांचा लिलाव करणारा भोवताली बाजार आहे
अशावेळी मनाला वनराईची ओढ आहे ,
त्या हवेची त्या नदीची त्या एकांताची ओढ आहे
एकांताची ओढ आहे
म्हणुन माझे ते जंगलच ठिक आहे

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...