आयुष्य नावाच माझ स्वप्नं
अर्धवटच राहील आहे
पहाट होण्या आधीच भंगुन
सगळं काही उजाडलं आहे
फुलपाखराच्या कोशासारखी
माझीही काही स्वप्न होती
वेगळी काहीच नाही हो
ति तुमच्याच सारखी होती
सावरुन स्वतःस पुन्हा मि
स्वप्न मनात धरली होती
माझ्याच लोकांनी त्याची लक्तरे
वेशीवरती टांगली होती
सोडुन त्या नराधमाना
प्रत्येक प्रश्न उठला माझ्यावर
लांछनाचा विषप्रयोग झाला
नकळत माझ्या मनावर
निघाली अंत्ययात्रा माझी जेव्हा
सर्वजण रडत होते
वेळ गेल्यावर आज सगळे
माझी किंमत समजत होते
बलात्कार केला राक्षसानी
परंतु समाज तो पिशाच्च ठरला
त्यानी फक्त शरिर लुटले
समाजाने तर खुन केला
पुरुषार्थाचे भाट सारे
आज लाजेने चुर झाले
रक्षिणारे हात जेव्हा
भक्षण्यास कामी आले
पुरुषार्थाचे गोडवे गाण्या
आता चांदभाट होणार नाही
स्त्रीलज्जा रक्षिणारे वीर
प्रताप शिवाजी होणार नाहीत
कारण
पुढारलेला समाज आजचा
विचाराने पांगळा आहे
21व्या शतकात राहुन
अवयवात अब्रु शोधत आहे
समाजमन गढूळ असल्यावर
मनाची पवित्रता कोण समजणार
आणी म्हणुनच
शरिर अत्याचाराच बळी ठरल्यावर
दोषी देखील मिच ठरणार.
बाजी©
omkarpandav.blogspot.com
No comments:
Post a Comment