Saturday, 11 May 2019

भेटते तु मला

भेटते तु मला  भेटते रातीचे
चांदणे  हे जसे रोज ह्या अंगणी
अंगणास भेटुनी चांदणे रोज ही
भेट ती पुर्ण ही होते का सांग ना
भेटते तु मला भेटते गगन हे
क्षितिज हे भासते भेटता धरणी
क्षितीजावरी भेटुनी रोज नभधरणी
भेट ती पुर्ण ही होते का सांग ना
बाजी©

Friday, 10 May 2019

तीच वाट ती

वाट तीच तरी अनोळखी होऊन,
आज लुटताना पाहीली
एक कविता लिहुन हातांनी,
आज मिटताना पाहीली
माझ्या अंगणीची ,माझीच बाग
बेनाम झाली कधी ,
माझ्याच मनसाखळीची
कडी आज तुटताना पाहीली

हक्काची  चांदरात कधीची ,
सुन्नपणे संपताना पाहीली
माझ्याच हृद्प्राजक्ताची फुले
निर्गंधपणे झडताना पाहीली
माझ्याच हृदयाचे माझेच डोळे
आज पाणावले  कधी ,
आपलीच सावली परकी होताना,
मि स्तब्धपणे पाहीली

Baaji

baaji

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...