वाट तीच तरी अनोळखी होऊन,
आज लुटताना पाहीली
एक कविता लिहुन हातांनी,
आज मिटताना पाहीली
माझ्या अंगणीची ,माझीच बाग
बेनाम झाली कधी ,
माझ्याच मनसाखळीची
कडी आज तुटताना पाहीली
हक्काची चांदरात कधीची ,
सुन्नपणे संपताना पाहीली
माझ्याच हृद्प्राजक्ताची फुले
निर्गंधपणे झडताना पाहीली
माझ्याच हृदयाचे माझेच डोळे
आज पाणावले कधी ,
आपलीच सावली परकी होताना,
मि स्तब्धपणे पाहीली
Baaji
baaji
No comments:
Post a Comment