Saturday, 20 June 2020

पावनखिंड

प्रचंड गर्जूनी रणी ,नर्क तया दावितो
खिंडीमधे बाजी बघा, सिद्दी आज गाडतो 

पडता टप्यात टाप  ,पट्टा भिडू लागला
सन सन बाण शत्रू मान छेदू लागला
काळ करी तरवारी,धारे वरी तोलला
लोटलेला लोट भला भाल्या वरी थोपला

शंभराला एकलाची पुरुनिया उरतो
खिंडीमधे बाजी बघा, सिद्दी आज गाडतो 

गोफणीच्या गुंडमारा खाली अरी ठेचला
पाश असा सिद्दीवरी,वरतूनी फेकला
नद आज खवळून सागरास खेटला
पाहुनी आवेश चंड सागर ही हटला

गाठूनिया खिंडीमधी, क्रूर कावा साधतो
खिंडीमधे बाजी बघा सिद्दी आज गाडतो

मराठ्याचा बाणा हर महादेव गर्जला
मारा हाणा मारा हाणा कल्लोळ हा चालला
शत्रू मास रगताने मराठा हा नटला
टिच टिच पाउलाला वीत वीत भांडला

तोफे आधी सुर्य कसा आज पाहू बुडतो
खिंडीमधे सिद्दी बघा आज कसा गाडतो


बाजी©

Sunday, 14 June 2020

बंडखोर

काळास सांगा जन्मतः मी बंडखोर आहे
नियतीस यत्ने जिंकतो तो मी मुजोर आहे

नाही असा झुकणार या काळापुढे कधीही
लढणार जिंकण्यार्थ हा मी भांडखोर आहे

होईल सारा खाक मी जाणार पीळ नाही
स्वभाव ही माझा जसा मी एक दोर आहे

स्वतंत्र आम्ही जन्मतः वार्यासमान ऐसे
ठेवील आम्हा मुठी  कोणात जोर आहे 

आली तुफाने ही किती हलणार ना जरासा
रक्तात सह्याद्री कडा झुंजार थोर आहे
बाजी© 

Friday, 5 June 2020

शिव राज्यभिषेक दिन अर्थात हिंदूसाम्राज्य दिवस

हिंदूसाम्राज्य दिवस अर्थात राज्यभिषेक  दिन

ज्या दिवशी हिंदूस्थानात  पाद आणी बादशाह्याना मर्हाटीकेसरीने आपला पंजा दाखवून रायगडावरुन गर्जना केली 
कि हे हिंदवी स्वराज्य (हिंदूंच स्वतःच राज्य)सार्वभौम आणी स्वतंत्र आहे आणी या राज्याचा भूपती विष्णू आम्ही छत्रपती रुपाने भोसले कुलदिपक शिवाजीस अभिषिक्त केले आहे 
सभासदाच्या भाषेत बोलायचे तर एक मर्हाटा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य जाहली नाही 
महाराष्ट्रश्री ने इतिहासात दोन दैदिप्यमान स्वतंत्रोत्सव राज्यभिषेक पाहिलेले आहेत एक शालिवाहनाचा आणी दूसरा छत्रपती शिवरायांचा 
 भरतखंडावर एखाद्या प्रांताने दोन शक संवत्सर कर्ते महापुरुष द्यावे हि घटना इतिहासात एकमेव आहे.
 हिंदूसाम्राज्य दिवस यासाठी कि पृथ्वीराज चौहान पासून विजयनगर साम्राज्यापर्यंत ईस्लामी सत्तेविरुद्ध हिंदूंच्या पराजयाची मालिका संपली होती आणी
 मुसलमान अजेय आहेत हि मानसिकता पुर्णपणे नाहिशी होऊन भारतभर हिंदूंना यातून स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली होती याच ज्वलंत उदाहरण छत्रसाल बुंदेला आहे 
 ज्या बादशहापुढे हिंदू सामंत,सरदार नजरा वर करु धजत नव्हते ते करारीपणाने उत्तरे देऊ लागले उदाहरण लछित बडफुकन हा आसामचा प्रतिशिवाजी आहे
 हा राज्यभिषेक केवळ आणी केवळ एका व्यक्तीचा नव्हता आणी राज्यभिषेक लौकिकानै कधी वैयक्तिक नसतो देखिल 
 हा राज्यभिषेक होता 
देव देश आणी धर्म यासाठी मरुन शिवराय या परमात्म्यात समावालेल्या प्रत्येक मावळ्यांच्या घोड्यांच्या हत्तींच्या आत्म्यांचा .
हा राज्यभिषेक होता लोकांचा 
ज्यांनी या राजावर जीव ओवाळून टाकला होता त्या सर्व लोकांचा 
हा राज्यभिषेक होता तीनशे वर्ष गुलामी सहन करणार्या महाराष्ट्र श्री चा 
हा राज्यभिषेक होता विश्वासाचा कि यापूढे 
कोणतं देऊळ पाडल जाणार नाही मुर्ती फोडली जाणार नाही 
कोणाचं घरदार शेत माळ जाळलं जाणार नाही
कोणाचे बायकापोर लुटले नासवले विकले किंवा मारले जाणार नाहीत
हा राज्यभिषेक होता हक्काचा 
हक्काच्या जागेचा जिथे लोकाना निष्पक्ष न्याय मागण्याचा हक्क मिळणार होता 
हा राज्यभिषेक होता कर्तव्याचा 
या भूमीसाठी ज्या ही विरांनी रक्त सांडले त्याच बलिदान व्यर्थ न जाऊ देता प्राणपणाने 
याच रक्षण करण्याच्या कर्तव्याचा
हा राज्यभिषेक होता हिंदूंच्या स्वप्नांचा 
अनादी काळापासूनच्या आमच्या मातृभूमीला
आमच्या पवित्र तीर्थाना ,दैवताना आमच्या पवित्र नद्याना आमच्या पवित्र संस्कृतीला परदास्याच्या कट्यारीखालून मुक्त करण्याचा 
आणी रायगडावरुन समस्त नरपशूंना धमकावण्याचा कि 
या राजा शिवछत्रपती ची तलवार दक्षिणेची ढाल आहे 
हिंदूंसाठी रक्षक भिंत आहे आणीधर्मवेड्या ईस्लामी सत्तेस काळ रुप आहे

तेज तरवार भयो, दख्खनकी ढाल भयो,
हिंदुकी दिवार भयो, काल तुरकानको 
 


 baaji©
omkarpandav..blogspot.com

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...