प्रचंड गर्जूनी रणी ,नर्क तया दावितो
खिंडीमधे बाजी बघा, सिद्दी आज गाडतो
पडता टप्यात टाप ,पट्टा भिडू लागला
सन सन बाण शत्रू मान छेदू लागला
काळ करी तरवारी,धारे वरी तोलला
लोटलेला लोट भला भाल्या वरी थोपला
शंभराला एकलाची पुरुनिया उरतो
खिंडीमधे बाजी बघा, सिद्दी आज गाडतो
गोफणीच्या गुंडमारा खाली अरी ठेचला
पाश असा सिद्दीवरी,वरतूनी फेकला
नद आज खवळून सागरास खेटला
पाहुनी आवेश चंड सागर ही हटला
गाठूनिया खिंडीमधी, क्रूर कावा साधतो
खिंडीमधे बाजी बघा सिद्दी आज गाडतो
मराठ्याचा बाणा हर महादेव गर्जला
मारा हाणा मारा हाणा कल्लोळ हा चालला
शत्रू मास रगताने मराठा हा नटला
टिच टिच पाउलाला वीत वीत भांडला
तोफे आधी सुर्य कसा आज पाहू बुडतो
खिंडीमधे सिद्दी बघा आज कसा गाडतो
बाजी©
अप्रतिम....👌👌
ReplyDelete