शतकाच्या त्या ,गुलामगीरीचा ,वचपा चल काढू
तान्हाजी गरजला , कडा चढूनीया,भगवा वर गाडू
संकटे विकट जरी वाट बिकट ही जात तिखट रांगडी
एक साथ करु आघात अरी निःपात करुत या घडी
लावूया बाजी राजं शिवाजी आपला गाजी शंभू अवतार
स्वप्न साकार करण्या कर वार भरा हूंकार शंभो हर हर
चला शत्रूच्या पदरी मृत्युचे दान आता वाढू
तान्हाजी गर्जला कडा चढूनीया भगवा वर गाडू
घोरपडी सत्वरे चढी दोर ने वरी हा शिव आदेश
गड्यानो चढा गडाला भिडा खटाला तोडा जिंकण्या देश
मर्हाटी बाणा मारा अन हाणा घेण्या कोंढाणा आज संग्रामी
आपली आण भगव्याची शान राखण्या मान येऊ या कामी
चला मोगली मनसुब्यांस खिंडार आता पाडू
तान्हाजी गर्जला कडा चढूनीया भगवा वर गाडू बाजी©
No comments:
Post a Comment