संताजी आले सैन्य वीजेसम, उसळून गेले मराठमोळे
मुगली छावणी पडली उताणी , औरंगजेब धरेवर लोळे
संताजी आया आया देखो , म्हणे क्रूर शैतान वो
उडती धडे अन कटे मुंडकी ,भैरव या वेताळ हो
अंधकारमय आसमंती तलवार , भासते सुर्य जणु
अंधकार रुपी मुगलांना तलवार , घोरपडी काल जणु
संताजी आले सैन्य वीजेसम उसळून गेले मराठमोळे
मुगली छावणी पडली उताणी औरंगजेब धरेवर लोळे
म्हणे संताजी
अरे भेकडा शहा औरंग्या , जनानखाना सोडून ये
तलवार घेऊनी लढण्या ये , वा साडी घाल नाचण्यास ये
खांडोळी खांडोळी करतो , कात्रजचा तुज घाट दावतो
शिवरायांचे तेज दावतो , मर्हाटी क्षात्रतेज दावतो
बाजी पांडव © कवितेचे सर्वाधिकार रक्षित.
No comments:
Post a Comment