Thursday, 6 January 2022

चुकूर होऊ नका

चुकूर होऊ नका, गड्यानो, चुकूर होऊ नका 
स्वराज कार्या मधे, कुणी ही, फितूर होऊ नका 

इमान ठेवा भगव्या पायी ,एकीच आपली ताकत हाई 
शिवाजी राजा सांगून जाई भाव भेद हा फुका 

भाव भेद हा फुका गड्यांनो चुकूर होऊ नका

रगात सांडू धर्मासाठी आयुष्य वाहू देशासाठी 
शंभू राजाच्या स्वप्नासाठी स्वार्थी होऊ नका

स्वार्थी होऊ नका गड्यांनो चुकूर होऊ नका


बाजी राधाकृष्णन्

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...