Friday 27 November 2015

मी मराठी....

लहानपणी सांगितल होत
आजोबानी आठवंत मला

ही माती आपली माता असेल तर हे
सह्याद्रीचे कडे बाप असतील!
तुला मातीची माया लगेच दिसेल
पण
या कडेदर्यांची माया मोठ्या संकटात धैर्याने उभे रहायला शिकवेल तुला
अगदी बापासारखं!
आयुष्यात तुझ्या बाळा ,
येईल निराशा जर कधी
तर  अशावेळी तु फक्त आपला इतिहास स्मर!
तुला जगण्याची हजार कारणं दिसतील.

बाजीराव पांडव(omkar)

Thursday 26 November 2015

ये परतुनी ! भाग पहीला रवी

सकाळच्यावे ळी मग या रवी डोळे कसेबसे उघडुन थोडा आळसावलेल्या स्थितीत उठतो.

मग तो वॉशरुमकडे जाउन येतो !आणी खिडकीतुन बाहेरच प्रभातेच वातावरण पाहत त्या वातावरणाचा आनंद घेत कसल्याशा विचारात गुंग होतो , जसे की त्याच्या sub concise mind ने त्याला पुढील दुर्दैवी घटनेचा अलर्ट दिला असावा!


तेवढ्यात मोबाईल आलेल्या मेसेजने त्याची तंद्री भंगते 

तो पटकन मोबाईल उघडतो व मेसेज पाहतो!तर तो मेसेज कंपनीचा असतो, तर खाली पाहतो तृर यशु चा सकाळी ७;२७amला 

तो मेसेज.

   dear ravi,

      aaj 8 0clock mala CCD LA bhetshil .

       mi wat baghtey lavkar ye.

         tuzi ashu



हा मेसेज वाचल्याबरोबरच रवी एकदम भुत पाहील्यागत आवरायला सुरुवात करतो!कसाबसा आवरतो !

पटकन गाडीची चावी घेतो पण कुणास ठाउक  त्याच्या मनात कुठेतरी खळबळ होती !

आज त्याला दुचाकीच घ्यावीसी वाटत होतं पण तरी त्याने मनाचा संदेश बाजुस ठेवुन चारचाकीच घेतली  आणी गाडी स्टार्ट करुन निघतो !

वाटेत तीला आवडणारा फुलांचा गुच्छ घेतो व घाईघाई  पोचतो व तिच्या समोर जाउन थोड वेगळच नटखट स्माईल देतो!

तब्बल अर्धा तास उशीर झालाय वेड्या!

मी काय तुझ्यासारखी रिकामटेकडी वाटली काय !

इतका उशीर कारे!

    हो नाहीतर महापौरच आहेस नाही का शहराची तु !माझ्यासाठी वेळ नसायला

हातात लपवलेली गुच्छ पुढै करत.

आता कसली वाट बघायचीय आयुष्यभर तर साथ रहायचय

  तीची कळी एकदम खुलली 

          म्हणजे तुझे पप्पा हो म्हणाले?

खर सांगतोयस!  

........"आता लग्नाला हो म्हणार नाहीत तर काय आता 

स्कॉलरशीपची परिक्षा दे म्हणणारेत."....तो म्हणाला...

काय माहीत तसही तु म्हणजे चिंटुच आहेस न माझा!

पण खर सांगु !

नाई विचारल अजुन 

 यावर थोडस चिडल्यासारख करुन 

..आ रे मग कधी विचारणारेस?!

मममी विचारणारे ना ,विचारतो ना माझ्या घरी !आजच विचारतो

हो का ,काई नको  ती म्हणते

आता तो पारच दांडी उडाल्यासारखा उडतो 

का? ग काय झाल?

यार जाम फट्टु आहेस बघ तु!

थोडासा विस्मयाने रवी..काय?

म्हणजे
आरे घाबरु नको रे 

मी विचारलं ते ! तुझ्या मम्मीला !

कककाय तु कधी ?केवा ?कस ? का ?
अस का केलस !
त्याला 44०व्होल्टचा झटका लागल्यागत हा धडाका येउन बसतो!
आणी नाहीतर काय तु गेले चार महीने झाले घरी सांगतोयस हा
मी किती दिवस वाट बघु ! घरच्यानी दुसरं जमवल असत तर
मि तर जिवंतपणीच मेले....

हे वाक्य पुर्ण होण्याधीच तो तिच्या ओठांवर हात ठेवत वाक्य रोखतो

काही क्षण असे शांततेत जातात .मग तो बोलतो
नाही अस बोलु नकोस ग ! ती कल्पनाही नाही सहावणार !
जसे चांदनीवीणा चंद्राची सुंदरता अर्धवट!
किनार्यावीणा समुद्र अर्धवट
जसे राधेशिवाय कृष्णलिला अपुर्ण
तसेच तुझ्याशिवाय मी ही अपुर्णच ना ग!
मान्य आहे
मी घरी विचारण्याची हिंमत करु शकलो नाही कारण मला भिती होती की माझ्या घरातुन कदाचित आपल्याला विरोध झाला आणी आपल्याला दुर केल तर मी कसा जगेन!
अस दुर्भिक्ष ची भितीने नाही ग सांगु धजावलो...
पण तुझं कस ऐकल !आईनी!
      एकदम सुर पालटुनच बोलला .त्याचृ हे बोलन तिला सवयीच होत भावनिक बोलता बोलता मधे पलटीचा सुर मारणं

अरे पिलु ,मि या आधी खुप विचार केला कि कात बोलु....कसं बोलु..
पणय ना काईच सुचल नाई रे,
सुचल नाई तर काय बोललीस पागल! तो आता थोडा वैतागून
तीच वाक्य पुर्ङ करण्याआधीच बोलला!

अरे मग मि आपल्याबद्दल च सगळ खर बकुन गेले!
मला वाटल हे आता अंगावर येतय काय पण तरी ते आवश्यकचृ होच ना !
हे सांगताना तिच्या हृदयाची कंपने रवीला जाणवु लागले!
तो मधेच म्हणाला "  मग आईनी तुला काय उत्तर दिल !
काय देणार ! आणखी त्यांचा तर सपोर्ट मिळाला पण जाम लेक्चर ऐकावं लागल!

बरय ना मग ,
लोकाना लेक्चर देणारीला ,आज सासुपुढ लेक्चर ऐकावंच लागलं की नाई

मार खाशील हा रवी तु ,   ,असकाही नाहीय हां!
त्याने मुड बदलत तीला टोमणे मारायला सुरुवात केली आणी तीने ही मुड बदलला
तोवर कॉफी संपवली पण होती मग
रवी ने बील पे केल आणी तिला मागे बसवुन कँनाटहुन निघणार की,
एक ओळखीचा अवाज त्यांच्या कर्णपटलावर येऊन पडतो!
इतकी कसली घाई रे ! येड्यानो...माझ्यासाठी नाय थांबणार! 

Wednesday 25 November 2015

आईच हवी

पप्पा मला ही आई नको !
.आईने रागावल्यामुळे सोनुला तिचा राग येतो तो त्याचे गाल फुगवुन म्हणतो

आपण दुसरी आणु!

आस डोळे पुसत चार वर्षाचा मुलगा म्हणतो !
वडील हलकेच हसुन त्याला पटकृन उचलुन कडेवर धरतात आणी लाडाने म्हणतात !

हो का !मलाही तशच वातल चल आपण मोठ्या आईकडे जाऊत!
कुत बीडला!

हो पप्पा स्मीतहास्य करीत म्हणाले!
नको मी नाई जानाल! सावत्र आईच नाव ऐकुन कान टवकारुन म्हणतो!!
 
तुमीच जा!
पप्पा आश्चर्ययुक्त स्मितभावाने
"का रे"
आवडत नाही का तुला मोथी आई!
नाही !
आवलते ना !
वडीलांच्या समाधानासाठी म्हणतो!
पण आईला ती रलवते ना म्हणुन म्हणुन  मग मी नाई येनाल !
जा तुमीच!

पप्पा मोठ्यानी हसतात!
ऐकलस का ग तुझी सवतं रडवते म्हणे तुला!
त्याला हळुच खाली सोडतात
मघाशी आले राग तो विसरतो अन आईच्या हळुच कुशीत शिरतो....

हा काय चमत्कार म्हणायचा गं , वडील विस्मयतेने विचारतात !

चमत्कार नाही हो काही ,
     आइ लेकराच प्रेम समुद्रासारख अथांग असते,
त्या भरती येते,
ओहोटी ही येते ,
पण समुद्र जसा आटत नाही तसं हे नात्यातलं प्रेम कधी संपत नाही!!

.बाजीराव©

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...