Wednesday, 25 November 2015

आईच हवी

पप्पा मला ही आई नको !
.आईने रागावल्यामुळे सोनुला तिचा राग येतो तो त्याचे गाल फुगवुन म्हणतो

आपण दुसरी आणु!

आस डोळे पुसत चार वर्षाचा मुलगा म्हणतो !
वडील हलकेच हसुन त्याला पटकृन उचलुन कडेवर धरतात आणी लाडाने म्हणतात !

हो का !मलाही तशच वातल चल आपण मोठ्या आईकडे जाऊत!
कुत बीडला!

हो पप्पा स्मीतहास्य करीत म्हणाले!
नको मी नाई जानाल! सावत्र आईच नाव ऐकुन कान टवकारुन म्हणतो!!
 
तुमीच जा!
पप्पा आश्चर्ययुक्त स्मितभावाने
"का रे"
आवडत नाही का तुला मोथी आई!
नाही !
आवलते ना !
वडीलांच्या समाधानासाठी म्हणतो!
पण आईला ती रलवते ना म्हणुन म्हणुन  मग मी नाई येनाल !
जा तुमीच!

पप्पा मोठ्यानी हसतात!
ऐकलस का ग तुझी सवतं रडवते म्हणे तुला!
त्याला हळुच खाली सोडतात
मघाशी आले राग तो विसरतो अन आईच्या हळुच कुशीत शिरतो....

हा काय चमत्कार म्हणायचा गं , वडील विस्मयतेने विचारतात !

चमत्कार नाही हो काही ,
     आइ लेकराच प्रेम समुद्रासारख अथांग असते,
त्या भरती येते,
ओहोटी ही येते ,
पण समुद्र जसा आटत नाही तसं हे नात्यातलं प्रेम कधी संपत नाही!!

.बाजीराव©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...