मन भुलले मन फुलले
मज रमवी उषा ही धुक्यात
झोंबतो थंड हा वारा
फिरता रानावनात !
रोमांचित होते ,शहरुन येते
जव होतो स्पर्श जलास
आनंदी लहर ही उठते
डिवचते स्वच्छंद मनास!
कुरणावरती ग रानसाजणी
हरएक पानी ग रानसाजणी
जणु सांडीयले मोती कुणी
जे सांगती न बोलता
जगाहो पळभर इतरास आनंदुनी
..........
हिच कविता
मन भुलले रे मन फुलले रे १२
मज रमवी उषा धुक्यात १०
झोंबतो सुगंधीत हा वारा १०
जव फिरता रानावनात ! १०
रोमांचित होते रे,शहरुन येते रे १२
जव होतो स्पर्श जिवनास १०
आनंदी लहर ही उठते १०
डिवचते स्वच्छंद मनास! १०
कुरणावरती चमचम करती १२
हर पानी ग रानसाजणी १०
जणु सांडीयले मोती कुणी १०
सांगती न बोलता जगाहो १०
दो क्षण जगास आनंदुनी१०
बाजीराव ©