Thursday 10 December 2015

तो काळ!

होती अशीही गंमत न्यारी
त्या  कालाची त्या वेळेची!
वसे चिमण्यांचा थवा आनंदे
बोले धेनु हंबरुनी!
काटेरी असुनी ती बोरं भरीची
ती खार दुडदुडे तिजवरती!
!१!
होती अशीही गंमत न्यारी
त्या  कालाची त्या वेळेची!

पहाट होता एकु येई आर्या मोरोपंतांची
ढळता सांज गायी आई गिते ती अंगाईची
त्या अंगाईला साथ हाताची
नाद नवा उदया येई
जशी निद्रादेवी ये ई तेव्हा
तशी येतच नाही आता ही....!२!

होती अशीही गंमत न्यारी
त्या  कालाची त्या वेळेची!

शाळा होती नदी पल्याडे
ते गुरुजी होते टोपीवाले
दांडी नित्याची त्या शाळा
काय गरज हो आम्हाला
तो निसर्ग आसेल जर गुरु आमुचा
आकाश असायचे छत त्याची
!३!
होती अशीही गंमत न्यारी
त्या  कालाची त्या वेळेची!

आठवता  गतकाल आपला
ते चेहरे अगणित गजबजती
उठतो आठवांचा कोलाहल अन
आग लागते हृदयासी
सरले आपले दिनसुखाचे
सुहृदय अंतरले हो मजसी
फिरुन सांगते हे मन मजला

होती अशीही गंमत न्यारी त्या काळाची  त्या वेळेची!
omi©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...