तू कधी ,पुन्हा तू कधी,कधी भेटसी , मला सांग ना
आभास तू ,का जाहली , स्वप्नात माझ्या,तू ये ना जरा
स्वप्नात तू,राहू नको ,कधी सोबती ,तू ये ना जरा
तू कशी,जशी चांदणी ,कधी रातीला ,तू ये ना जरा
मी तुझा,होऊ दे तुझा,मला गुंतू दे,तू ये ना जरा
तू कधी ,मनाला कधी,कधी गुंफले,कळे ना मला
का तुझी,मनाला तुझी,का ओढ लागे ,कळे ना मला
तू आता,मला सोबती ,सवे चालण्या, तू ये ना जरा
तू असा ,तो चंद्र जसा ,सवे चांदणीच्या तू ये ना जरा
तू असा,जसा श्वास हा ,हृदयात ये,तू ये ना जरा
No comments:
Post a Comment