Wednesday, 22 February 2017

सैनिकाची प्रेमकथा

बघतीस काय लपवुनी भावना,
सखये बोल जराशी ,
लटके भांडण करुनी अशी,
पाठमोरी  बैसशी
रागे भरलेल्या तव वदनी,
खुलून खळी उमटावी
वदन पाहता तव मनरमणी ,
हृदय'तरी' झुलावी
एकएकट्या गर्दरानीही हळुवार ,
झुळुक चलावी
स्पर्शुनी मग तनास तुझीया ,
शिरशिरी मनात उठावी
गर्दछायेच्या सापटीतूनही,
किरणे ती डोकावी
किरणांशी खेळत कुंतल ,
विजेरीसम चमकावी
पसरले  बघ भुयीवरी गालीचे,
तृण स्पर्शुदे अंगाशी
होउ दे मनभावना एक ह्या,
आपुली प्रीत बहरावी
आसवमृग रोधुनी धर हा,
विरह आता संपला
बहुकष्टाने बहुवर्षाने उभयता,
प्रेममळा राखला
हृदय का पाकळी जाहले,
स्मित तव पाहता
परतुनी आलो तुझ्याकरिता ,
आता जीव थकला
परि,
प्रेयसी होती ती ही मोठी,
सुंदर मनरमणी
सीमेवरची माझी लाडकी,
सवत तुझी संगिणी
माहीत होती तुजला आधीच,
माझी प्रेमकहाणी
बसलीस मग अशी स्वागत वेळी,
पाठ का तू फिरवुनी

#बाजी©

Saturday, 18 February 2017

शिवभारतम् मधील महाराजांचे जन्मवर्णन

महाराजांचे जन्मकाळचे वर्णन तत्कालीन (जन्मानंतर पुढील वर्षानी लिहिलेल्या)
शिवभारतम् मधील बालराजांचे वर्णन

भुबाणप्राणचंद्राद्वैही सम्मिते शालीवाहने
शके संवत्सरे शुक्लेः प्रवृते च उत्तरायणे !26!


अर्थ -शालीवाहन शके 1551  शुक्लनाम संवत्सरात उत्तरायणात

शिशिरऋतौ वर्तमाने प्रशस्ते मासे फाल्गुने
कृष्णपक्षे तृतीयायां  निशिलग्ने सुशोभने  !27!

शिशिर ऋतुमध्ये
फाल्गुन वद्य तृतीयेला रात्री,
शुभ लग्नावर , अखिलपृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे पाच ग्रह अनुकुल व उच्चीचे असताना तिने (जिजाबाईंनी)
अलौकिक पुत्रास जन्म दिला !

अनुकुलस्तरैस्तुंसंश्रैयेः पश्चभिःर्ग्रहे
व्यर्जीताशेषजगती स्थिर साम्राज्यवैभवम्    !28!   
अपारलावण्यमयं स्वर्णवर्णमनामयं
कमनीयतमग्रीवम् उन्नत स्कन्धमण्डलम्  !29!

त्याचे लावण्य अपार ,वर्ण सुवर्णासारखा,
निरोगी शरीर , मान अत्यंत सुंदर व खांदे अत्यंत उंच होते

अलिकान्त मिलिकान्त कुन्तलाग्रविराजितम्
सरोजसुंदरदृश्यं  नवकिंशुकनासिकम्  !3०!

त्याच्या कपाळावर सुंदर कुंतलाग्रे पडल्यामुळे ते मोहक दिसत होते .
त्याचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर
नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी

सहजस्मेरवदनं  घनगंभीर निस्वनम्
महोरस्कं महाबाहु सुषुचं साभ्दुतं सुतम्  !31!

मुख स्वभावतः हसरे
स्वर मेघाप्रमाणे गंभीर !
छाती विशाल व बाहु मोठे होते .
    
      शिवभारतम्
           कवी परमानंद

बाजी©

Wednesday, 15 February 2017

नातेच जुने

अक्षरे नी शब्द
..विरह आणी वर्ष
भावना सवे स्पर्श
..
तु आणी हर्ष
नातेच जुने......
शीत आणी हिम
दवासवे ही तृण
विना सावे ती तार
तो
तु आणी हर्षफार

नातेच जुने...

#बाजी©

Monday, 13 February 2017

प्रत्येकाच्या मनात एक ती असते
भावना अव्यक्त तरी बोलत नसते
पाहुन ही ती पाहत नसते
नजरेआडुन लाजत असते..

Monday, 6 February 2017

होळकर मिलर यांचा विवाह सोहळा आणी धर्मांतर !


टाईम्स अॉफ इंडीया 1फेब1928 च्या
अंकात नाशिकची जाने.30 ची
बातमी प्रसिध्द झाली.
त्यात मिस् मिलरच्या हिंदुकरणासंबंधी
चर्चा तसेच यास शंकराचार्यांची
याबद्दलची भुमिका याचा उल्लेख आला
आणी या बातमीनंतर जो वणवा पेटला
त्याने वर्षभर सर्व वर्तमानपत्राना
खाद्य पुरवले परंतु यामुळे तत्कालीन हिंदु
समाजाच्या जिवनात क्रांतीकारक
प्रसंग ठरला.त्याची हकीकत पण तशीच
रोमान्स आणी रोमांचक आहे
मिलर होळकर प्रेमसंबंध:-
इव्हीनिंग स्टँडर्ड (लंडन) येथुन प्रसिद्ध
झाल्याप्रमाणे तुकोजीराव तृतीय व
मिस् मिलर यांचा प्रथम परिचय
इ.स.१९२६ साली ल्युसर्न येथे झाला
तेवा तिचे वय 18 होते व तिने नुकतीच
शाळा सोडली होती .तीच्या
मागोमाग होळकर इंटरलेकन आणी पॕरिस
येथे गेले तिथै त्यांनी आपली इच्छा प्रकट
केली.मिस् मिलर यांच्या आईने जरी या
मागणीस उत्तेजन दिले नाही तरी
हिंदुस्थानातील राजा मुलीस
मागणी घालतो याचा आनंद वाटून
आपल्या घरी सीटल येथे
पाहुणचारासाठी बोलावले (मिलर
यांच्या सोन्याच्या खाणी असल्याचे
वर्णनही आहे )
महाराज अमेरिकेला गेले मिलर मँन्शन मधे
त्यांचे थाटात स्वागत झाले तिच्या
मैत्रिणी कडुन आंमंत्रणे आली आणी हे संबंध
घनिष्ठ होत गेले .
अभुतपुर्व घटना :-एक विदेशी विधर्मी
श्रीमंत सुशिक्षित महीला हिंदु
धर्मात प्रवेश करु इच्छीते ही घटनाच
अभुतपूर्व होती .आजपर्यंत बळानेछळाने
आमचे लाखोने धर्मांतर झाले पण कधी
त्याना मघारी पुन्हा स्वधर्मात घेतले
नाही परंतु आज यादोघांसाठी
शंकरचार्य डॉ.कुर्तकोटी यांनी प्रयत्न
करावेत हेच अभुतपुर्व!
गुंतागुंत:-हिंदुकरणाला प्रेमप्रकरणाची
पार्श्वभूमी असल्याने गुंतागुंत अधिक
वाढते.हा विवाह इतर
कायदेशीरमार्गाने होऊ शकत नाही
म्हणुन हिंदुकरणास मिस् मिलर तयार
झाली असा ही आक्षेप घेतला जातो .
त्यातच "संदेश" ने दि२-२-१९२८ तीन
तारा छापल्या त्यात एक अब्दुल्ला
कुरेशी यांची असुन यात म्हटले आहे कि
महाराजानी व मिस मिलर यानी
इस्लामचा स्विकार करावा .तोच धर्म
त्याच्या मनाला आत्म्याला शांती
देईल ........
वादंग :- या तारे मुळे गुंतागुंतीत अधिकच
भर पडली !
हिंदुधर्मातील राजास इच्छित
विवाह करता येत नाही म्हणुन दुसरा
धर्म स्विकारावा ही नामुष्की येऊ नये
म्हणुन
हिंदुकरणास सत्यशोधक,आर्यसमाज,तसेच
हिंदुधर्म मंडळाने पाठींबा दिला .
देशभरात वादंग उठले होते ,नाशिकला
तर ठिकठिकाणचे धर्ममार्तंड,पंडीत
गोळा हौऊन न भुतो न भविष्यती वाद
जाहले
आणी शेवटी संमती मिळाली
क्रमशः.......
यासाठी
१.अनंत विनायक चित्रे यांचे करविर
मठाधिपती शंकराचार्यास पत्र
२.मिस् मिलर यांचे धर्मपीठास पत्र
३.शंकराचार्याचे त्यास
प्रत्यात्तरादखल पत्र
४.महाराजा तुकोजीराव होळकरांचे
शंकराचार्यांस पत्र अभ्यासावेत!

बाजीराव पांडव ©

भाग दुसरा ... एक ऐतीहासिक ब्रिटिश कालीन विवाह सोहळा


शुद्धीला शास्त्र प्रमाण
........देताना शंकराचार्य म्हणतात
संपुर्ण देवल स्मृती पतितपरिवर्तना करिता झालेली आहे आणी तिची सुरुवात
भग्वन्म्लेन्छनीता हि कथंशुद्धीमवान्पुयुः अशि झालेली आहे आहे
म्लेन्छेनीर्तेन विप्रेण अगम्यागमनं कृतम्
तस्य शुद्धीं प्रवक्ष्यामि........
या आठव्या पासुन बाराव्या श्लोकापर्यंतच्या श्लोकाच्या आधारे पतितास स्वधर्मात घेता येते शंकराचार्यानी सिद्ध केले.
हिंदुकरणास अनुकुल अश्या गटाने प्रतिपादन केले होते की ,
जन्मजात हिंदु नसलेल्या व्यक्तीला हिंदु करुन घेणे उचितच आहे,कारण अन्य धर्म हे धर्म नसुन पंथ आहे.
या हिंदुकरणामुळे मिस् मेयोने केलेल्या हिंदुंच्या कुचेष्टेस योग्य झोंबणारे उत्तर मिळेल.हिंदुकरण ही बाब महत्त्वाची समजावी ,विवाह गौण समजावी
शंकराचार्य श्री कुर्तकोटी यांची भुमिका
संपुर्ण जबाबदारी शंकराचार्यानी घेऊन गंगापुर मठाच्या जागेतच तो पार पाडण्याची तयारी केली यासाठी नाशिकमध्राये एक समिती रा.पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती
हिंदुकरणाची तारिख 13-3-1928 ही ठरली .आदल्या दिवशी मिस् मिलर यांचे नाशिकात आगमन झाले दुपारी मिस् मिलर शंकाराचार्याना भेटण्यास गेलो तिथे एक तास मुलाखतीनंतर पुढील शपथविधीवर सही केली!
..... मिस् मिलर यांची शपथ
मि (n.a.miller)अमेरिकेतील संयुक्त संस्थानात राहणारी अविवाहीत असुन सध्या बढवाई येथे राहते मि केवळ पैसा व मानमरातब यास भुलुन हिंदुधर्म स्विकारत नाही तर स्वतःच्या खुशीने हिंदुधर्माबद्दल प्रेम असल्यामुळे हिंदु धर्मात येण्याचा निश्चय केला आहे तरी स.श्री शंकाराचार्य श्री विद्याशंकर भारती स्वामी कुर्तकोटी याना माझी विनंती आहे की त्यानी मला आपल्या पिठातर्फे शुद्ध करुन घेऊन शास्त्राधारे हिंदुधर्माची दिक्षाद्यावी मी यावत्जीव हिंदुधर्मात राहून यापुढे सर्व आयुष्यभर हिंदु तत्वे पाळण्याचा माझा निश्चय आहे तरी श्रीनी मला पावन करुन हिंदुधर्मात घ्यावे ,अशीमाझी विनंती आहे ,
.........सही
........(ज्ञानप्रकाश 14-3-1928)
गंगापुरचा गोदावरी घाट...
दि 13-3 1928
सकाळी ८:30 वाजता विधीस गंगापुर क्षेत्री गोदावरी घाटावर सुरुवात झाली
विधी..
घाटावर मिस् मिलर मराठा ड्रेस मधे येताच टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले नंतर स्थानापन्न झाल्या .संस्कारविधीचे नेतृत्व श्री लक्ष्मण शास्त्री मुरगुडकर यानी केले.
विशेष म्हणजे मंत्राचा इंग्रजी अर्थ सांगण्याचे काम श्री या .र.दाते,सहसंपादक ज्ञानकोश
हे करित होते
संकल्पाचा उच्चार करताना
सनातन धर्मदीक्षाग्रहणंधिकारद्वारा नागलोकोत्पन्नायाः मिलरवंशसमुद्भुतायाः नान्सी नाम्साः मम......
याप्रमाणे तोंडची वाक्य ऐकताना ,पंचगव्य प्राशन करताना किंवा बालकृष्णाची पुजा करताना प्रेक्षकांच्या मनात कोणत्या भावनांची गर्दी उडाली असेल कल्पनाच करावी
त्यानंतर स्वतः शंकराचार्यानी पौरोहीत्य करुन कार्यक्रम पार पाडला .
पुरोहीतांनी मिलर यांचे नाव शर्मिष्ठा ठेवुन त्याना कुंकु लावले आणी हिंदुधर्माच्या जयकाराचा एकच कल्लोळ उडाला
शंकराचार्यानी पिठातर्फे आहेर केला
विर सावरकर व पं. सीतारामशास्त्री यांची अभिनंदन पर भाषणे झाली
भाषणे फोटोंमधे
बाजीराव पांडव

Saturday, 4 February 2017

होळकर मिलर यांचा विवाह सोहळा आणी धर्मांतर !


टाईम्स अॉफ इंडीया 1फेब1928 च्या
अंकात नाशिकची जाने.30 ची
बातमी प्रसिध्द झाली.
त्यात मिस् मिलरच्या हिंदुकरणासंबंधी
चर्चा तसेच यास शंकराचार्यांची
याबद्दलची भुमिका याचा उल्लेख आला
आणी या बातमीनंतर जो वणवा पेटला
त्याने वर्षभर सर्व वर्तमानपत्राना
खाद्य पुरवले परंतु यामुळे तत्कालीन हिंदु
समाजाच्या जिवनात क्रांतीकारक
प्रसंग ठरला.त्याची हकीकत पण तशीच
रोमान्स आणी रोमांचक आहे
मिलर होळकर प्रेमसंबंध:-
इव्हीनिंग स्टँडर्ड (लंडन) येथुन प्रसिद्ध
झाल्याप्रमाणे तुकोजीराव तृतीय व
मिस् मिलर यांचा प्रथम परिचय
इ.स.१९२६ साली ल्युसर्न येथे झाला
तेवा तिचे वय 18 होते व तिने नुकतीच
शाळा सोडली होती .तीच्या
मागोमाग होळकर इंटरलेकन आणी पॕरिस
येथे गेले तिथै त्यांनी आपली इच्छा प्रकट
केली.मिस् मिलर यांच्या आईने जरी या
मागणीस उत्तेजन दिले नाही तरी
हिंदुस्थानातील राजा मुलीस
मागणी घालतो याचा आनंद वाटून
आपल्या घरी सीटल येथे
पाहुणचारासाठी बोलावले (मिलर
यांच्या सोन्याच्या खाणी असल्याचे
वर्णनही आहे )
महाराज अमेरिकेला गेले मिलर मँन्शन मधे
त्यांचे थाटात स्वागत झाले तिच्या
मैत्रिणी कडुन आंमंत्रणे आली आणी हे संबंध
घनिष्ठ होत गेले .
अभुतपुर्व घटना :-एक विदेशी विधर्मी
श्रीमंत सुशिक्षित महीला हिंदु
धर्मात प्रवेश करु इच्छीते ही घटनाच
अभुतपूर्व होती .आजपर्यंत बळानेछळाने
आमचे लाखोने धर्मांतर झाले पण कधी
त्याना मघारी पुन्हा स्वधर्मात घेतले
नाही परंतु आज यादोघांसाठी
शंकरचार्य डॉ.कुर्तकोटी यांनी प्रयत्न
करावेत हेच अभुतपुर्व!
गुंतागुंत:-हिंदुकरणाला प्रेमप्रकरणाची
पार्श्वभूमी असल्याने गुंतागुंत अधिक
वाढते.हा विवाह इतर
कायदेशीरमार्गाने होऊ शकत नाही
म्हणुन हिंदुकरणास मिस् मिलर तयार
झाली असा ही आक्षेप घेतला जातो .
त्यातच "संदेश" ने दि२-२-१९२८ तीन
तारा छापल्या त्यात एक अब्दुल्ला
कुरेशी यांची असुन यात म्हटले आहे कि
महाराजानी व मिस मिलर यानी
इस्लामचा स्विकार करावा .तोच धर्म
त्याच्या मनाला आत्म्याला शांती
देईल ........
वादंग :- या तारे मुळे गुंतागुंतीत अधिकच
भर पडली !
हिंदुधर्मातील राजास इच्छित
विवाह करता येत नाही म्हणुन दुसरा
धर्म स्विकारावा ही नामुष्की येऊ नये
म्हणुन
हिंदुकरणास सत्यशोधक,आर्यसमाज,तसेच
हिंदुधर्म मंडळाने पाठींबा दिला .
देशभरात वादंग उठले होते ,नाशिकला
तर ठिकठिकाणचे धर्ममार्तंड,पंडीत
गोळा हौऊन न भुतो न भविष्यती वाद
जाहले
आणी शेवटी संमती मिळाली
क्रमशः.......
यासाठी
१.अनंत विनायक चित्रे यांचे करविर
मठाधिपती शंकराचार्यास पत्र
२.मिस् मिलर यांचे धर्मपीठास पत्र
३.शंकराचार्याचे त्यास
प्रत्यात्तरादखल पत्र
४.महाराजा तुकोजीराव होळकरांचे
शंकराचार्यांस पत्र अभ्यासावेत!

बाजीराव पांडव ©

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...