Wednesday, 22 February 2017

सैनिकाची प्रेमकथा

बघतीस काय लपवुनी भावना,
सखये बोल जराशी ,
लटके भांडण करुनी अशी,
पाठमोरी  बैसशी
रागे भरलेल्या तव वदनी,
खुलून खळी उमटावी
वदन पाहता तव मनरमणी ,
हृदय'तरी' झुलावी
एकएकट्या गर्दरानीही हळुवार ,
झुळुक चलावी
स्पर्शुनी मग तनास तुझीया ,
शिरशिरी मनात उठावी
गर्दछायेच्या सापटीतूनही,
किरणे ती डोकावी
किरणांशी खेळत कुंतल ,
विजेरीसम चमकावी
पसरले  बघ भुयीवरी गालीचे,
तृण स्पर्शुदे अंगाशी
होउ दे मनभावना एक ह्या,
आपुली प्रीत बहरावी
आसवमृग रोधुनी धर हा,
विरह आता संपला
बहुकष्टाने बहुवर्षाने उभयता,
प्रेममळा राखला
हृदय का पाकळी जाहले,
स्मित तव पाहता
परतुनी आलो तुझ्याकरिता ,
आता जीव थकला
परि,
प्रेयसी होती ती ही मोठी,
सुंदर मनरमणी
सीमेवरची माझी लाडकी,
सवत तुझी संगिणी
माहीत होती तुजला आधीच,
माझी प्रेमकहाणी
बसलीस मग अशी स्वागत वेळी,
पाठ का तू फिरवुनी

#बाजी©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...