Monday, 25 September 2017

पिडीतेच मनोगत

पिडीतेच मनोगत

निघाली अंत्ययात्रा माझी
सर्वजण रडत होते
वेळ गेल्यावर आज सगळे
माझी किंमत समजत

बलात्कार केला राक्षसानी
परंतु समाज तो पिशाच्च ठरला
त्यानी फक्त शरिर लुटले
समाजाने तर खुन केला

पुरुषार्थाचे भाट सारे
आज लाजेने चुर झाले
रक्षिणारे हात जेव्हा
भक्षण्यास कामी आले
पुरुषार्थाचे गोडवे गाण्या
आता चांदभाट होणार नाही
स्त्रीलज्जा रक्षिणारे
प्रताप शिवाजी होणार नाहीत
कारण
पुढारलेला समाज आजचा
विचाराने पांगळा आहे
21व्या शतकात राहुन
अवयवात आब्रु शोधत आहे

समाजमन गढूळ असल्यावर
मनाची पवित्रत कोणाला समजणार
आणी म्हणुन
शरिर अत्याचाराच बळी ठरल्यावर
दोषी देखील मिच ठरणार.

बाजी©
omkarpandav.blogspot.com

Monday, 18 September 2017

हा रजनी गंध

हा रजनी गंध  छेडीतो तुला
बनोनी माझा सांगाती
सवे सत्तावीस ही नक्षत्र घेऊनी
चंद्र आला सोबती
आज सौदा प्रेमाचा करु
साक्षीला चंद्र आहे इथे
बंध आपुल्या नात्याचे रमणी
आज करु घट्ट इथे
बाजी©

तुज पाहता

तुज पाहता रमले मन असे प्रिये
विसरले भान अन् स्वत्व इये
तुझ आठविण्या गुंतलो बहु मी
प्रयत्नात विसरलो स्वत्ःस मनी

बाजी©
omkarpandav.blogspot.com

Saturday, 16 September 2017

एक नजर महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर !

एका स्वयपाकीनी ची जात शोधली वरुन गुन्हा दाखल केला !
शिव शिव शिव धर्म बुडाला !
आणी
दुसरे ,
   आमच्या जिवावर जगणारे बाह्मण आमच्याच बापजाद्यांच्या राज्यात
आमच्यावर कुरघोडी करायले !
आणी तीसरे
पुरोगामी महाराष्ट्रातली काळीमा फासली जाणारी घटना !
साले तीन्ही पण महा चु* !
 
महाराष्ट्राच पुरोगामित्व मात्र तेव्हाच धोक्यात येतं जे एखादी गोष्ट ब्राह्मण करील !
कारण ,
शांतताप्रिय समंजस समाज
काही प्रमाणात घाण सगळीकडे असतेच पण त्याच काहीच नाही 
पण आम्हाला राजकिय पोळी भाजायची संधी मिळते ती दवडुन कशी चालेल
आमचा महाराष्ट्र स्वतःला पुरोगामी म्हणतो 
     काय **चा पुरोगामी आहे का .?
आजही निवडणुकीत उमेदवारी पासुन ते पदा पर्यंत #जात
पहीले लागते .

आम्ही उमेदवार उभा करतो प्रभागातली त्या समाजाची लोकसंख्या बघुन !
बाकी त्या उमेदवाराच चरित्र्य वैगेरे गेल *कात .
आणी
निवडुण आल्यावर विकास फक्त त्याच भागाचा होतो ज्या भागात ह्या उमेदवाराची जात असते
आयच्या गावात पुरोगामित्वाच्या !
आता गावात येऊत !
   गावात पण
ज्या जातीची लोकसंख्या जास्त ते तिथले अनिभिषिक्त राजे बाकीच्यानी काही बोलायच नाही
  आणी कसलंच वर्चस्व राजकीय असो नाहीतर आणखी काही अजिबात
उडायच नाही उडले की उडले जगातनं
लोकशाही च्या आयच्या गावात !
आता गल्लीत जाऊ आमच्या गल्ल्याना कॉलनीला  आजुनही
  जातीवरुनच नाव आहेत बरं
तिथल्या चौकात नाव काय द्यायच
कोण्या जातीतल्या महापुरुषाच द्यायच यावरुन मारा मार्या
मग सामाजिक सलोख्याच्या आयच्या गावात !
हे झालं राजकिय !
आपल्या इकडे
  शाळा कॉलेजच admission पण जातीच concentration बघुन केल जात
पार संस्थापका पासुन ते ट्रस्टी पर्यंत पाहीली जाते
जात
नंतर admission ला आम्ही ओरडु ओरडु सांगतो
   आमची जात !
इथं समानते च्या आयच्या गावात !
मग आम्ही बाहेरा येतो शिकायला
इथ रीम बघताना
पहीले विचारतात गाव आणी नंतर आडनाव
उद्देश असतो
जात !
पुरोगामित्वाच्या आयच्या गावात !
इथंही कालेजात जातीवरुन बरेच ग्रुप आहैत त्यात भांडण ही आहेत ते वेगळं
इथ पोरगी आवडली एखादी तर पटवायच्या आधी पण बघतेत की ओ
जातं
प्रेमाच्या आयच्या गावात
आता सामाजिक
आमच्या संघटना स्वतःच्या कसल्याशा फालतु स्वाभीमान निर्मिती साठी सरसकट दुसर्या जातीची ,महापुरुषांची ,इतीहासाची एवढच नाहीतर त्या जातीतल्या स्त्रियांची पण खालच्या पातळीवर जाऊन विटंबना करतात
तेव्हा पण आमचा पुरोगामी महाराष्ट्र गप्प असतो .
लहानपणा पासन सगळ्यात जास्त पोट्ट्यांवर काय बिंबवले जात असेल तर ती असते जात
संस्कार नंतर !
इतीहासात पहीले कोणत्याही महापुरुषाची profile वाचताना आम्ही शोधतोच
जात
इतीहासात आम्ही कोण कोण्या जातीचा हे सिद्ध करुन आजही आम्ही
मारामार्या करतो
इथही
आयच्या गावात पुरोगामित्वाच्या !
आणी म्हणे पुरोगामी महाराष्ट्र !
   हा महाराष्ट्र सोयिस्कर पुरोगामी बनलाय
समानतेच्या गोष्टी करतायत
जातीशिवाय पान हलत नाही ,
     आम्ही मागास आहोत कारण आम्ही ह्या जातीचे आहोत
आम्ही मागास आहोत कारण आम्ही स्त्रिया आहोत
पोराला वेगळी फिस
पोरीना वेगळी
ह्या जातीला इतकी त्या जातीला तितकी फिस
आमची गरिबी अजुन ही जात बघुन येतो मग
कस काय महाराष्रातली जनता पुरोगामी म्हणवते स्वतः ला

बाजी पांडव राक्षसभुवनकर
टिप.
हा लेख काही पुण्याच्या खौले प्रकरणाची तरफदारी करण्यासाठी नाही
मि वैयक्तिक त्या घटनेचा निषेधच करतो
लेखाप्रपंच यासाठी की
यामुळे बिघडत असलेला सामाजिक सलोखा !
बाजी©

जगावे नव्याने

वाटते आज मज जगावे नव्याने....
कुजत चालले दिवस जीवनी
  विसरावे ताप बहु निरस यौवनी
विचारांची तुफाने
  .............. संपवावी नव्याने
वाटते आज मज.जगावे नव्याने ..

बाहु पसरावे ...धुंद लहरावे .
बेबंद उडावे क्षितीजाकडे...
मावळतीच्या गंधीत दिशेला
आज स्वस्थतेने
पहावे नव्याने...
वाटते आज मज जगावे नव्याने

बाजी©

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...