Monday, 25 September 2017

पिडीतेच मनोगत

पिडीतेच मनोगत

निघाली अंत्ययात्रा माझी
सर्वजण रडत होते
वेळ गेल्यावर आज सगळे
माझी किंमत समजत

बलात्कार केला राक्षसानी
परंतु समाज तो पिशाच्च ठरला
त्यानी फक्त शरिर लुटले
समाजाने तर खुन केला

पुरुषार्थाचे भाट सारे
आज लाजेने चुर झाले
रक्षिणारे हात जेव्हा
भक्षण्यास कामी आले
पुरुषार्थाचे गोडवे गाण्या
आता चांदभाट होणार नाही
स्त्रीलज्जा रक्षिणारे
प्रताप शिवाजी होणार नाहीत
कारण
पुढारलेला समाज आजचा
विचाराने पांगळा आहे
21व्या शतकात राहुन
अवयवात आब्रु शोधत आहे

समाजमन गढूळ असल्यावर
मनाची पवित्रत कोणाला समजणार
आणी म्हणुन
शरिर अत्याचाराच बळी ठरल्यावर
दोषी देखील मिच ठरणार.

बाजी©
omkarpandav.blogspot.com

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...