वाटते आज मज जगावे नव्याने....
कुजत चालले दिवस जीवनी
विसरावे ताप बहु निरस यौवनी
विचारांची तुफाने
.............. संपवावी नव्याने
वाटते आज मज.जगावे नव्याने ..
बाहु पसरावे ...धुंद लहरावे .
बेबंद उडावे क्षितीजाकडे...
मावळतीच्या गंधीत दिशेला
आज स्वस्थतेने
पहावे नव्याने...
वाटते आज मज जगावे नव्याने
बाजी©
No comments:
Post a Comment