जब तक झाँसी स्वतंत्र ना करु,
न शृंगार करुंगी न सिंदुर लगाउंगी
अशी शपथ घेणारी तेजस्वी शलाका १८५७ च्या स्वतंत्र्ययुद्धात आपली चमक सोडुन गेली ज्या चमकेने सबंध पाश्चात्त्यांचे डोळे तेजाने दिपुन गेले ती झांशीच्या महालक्ष्मी ची सखी रणचंडी झलकारी बाई !
झलकारीबाई राणी लक्ष्मीबाईंच्या दुर्गा या स्त्री दलाची सेनापती !
प्रखर निष्ठा आणी मुर्तीमंत शौर्य उपजत घेऊन आलेली युद्धशलाका .
झलकारीबाईंचा जन्म २०नोवेंबर १८३० रोजी भोज या झाशी नगराच्या वायव्येस स्थित छोट्याशा गावात झाला .
वडीलांचे नाव मुलचंद तर आईचे धनिया असे होते. त्या कोरी या समाजातील होत्या . त्या आईवडीलांच्या एकुलती एक संतान .वर्णाने सावळ्या परंतु रुपाने सुंदर अशी ही कन्या जन्मतः शुर होती कारण
भोज हे खेडे जंगलकिनारी असल्याने गावकर्याना हिंस्र पशु व लुटेरुंच्या टोळ्याना सतत तोंड द्यावे लागत असत.म्हणुन सर्व लोक शस्त्र निपुन होते.
झलकारीबाईं चे वडील झाशी संस्थानात सैनिक होते ते उत्तम तीरंदाज ही होते.आई देखील तशी शुर होती ,उभय दांपत्य हे धार्मिक वृत्तीचे म्हणुन हाच गुण झलकारीबाईंमध्ये देखील उतरला होता .
त्याचप्रमाणे मुलचंदने आपल्या मुलीस युद्धकलेचे संपुर्ण ज्ञान दिले होते .
तिच्या शौर्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात
त्यातीलच एक अशी की,
एके दिवशी झलकारीबाई गुरे घेऊन रानात गेली असता तिच्यावर चित्याने अचानक झडप घातली
तेव्हा धैर्यवान मुली बाजुला उडी मारुन स्वतःचा बचाव केला आणी हातातील लाठीने चित्याच्या नाकाजवळी वर्मावर असा प्रहार केला
की चित्ता जागेवरच निपचित होऊन पडला .नंतर तिने त्याला लाठीने इतक मारल की तो त्यातच मेला .
या कृत्याची सगळीकडे प्रशंसा केली गेली
तिच्या शौर्यगाथेतील एका घटनेत तिने गावच्या मुखियाच्या घरावर रात्री दरोडा घालण्यास आलेल्या दरोडेखोराला लाठीनेच बदडले होते आणी नंतर मुखियाने तिला आपली मुलगीच मानली .त्यानंतर तिची सगळीकडे प्रशंसा झाली .
नंतर झलकारीबाई वयात आल्या नंतर पुरणचंद ह्या झाशीसंस्थानात तोफखान्यावरील गोलंदाजाशी तिचे लग्न लावले गेले लग्नात मुखियाने गावभोजन दिले
आणी लग्नानंतर उभय दांपत्य झाशीस राजाराणीचा आशीर्वाद घेण्यास महालात गेले आणी इथे दोन दुर्गा प्रथमच एकमेकीना भेटल्या झलकारीबाई तील तडफ राणी लक्ष्मीबाईंनी हेरली आणी आपल्याच पदरी नोकरीस ठेवुन घेतले
इथेच एका अध्यायाची अथश्री झाली
राणीने सह्स्रचंडी याग करण्याचे काम झलकारीस दिले तो चंडीयाग होता
दुर्गादल स्थापिण्याचा आणी प्रमुख होती प्रत्यक्ष रणदुर्गा झलकारीबाई .
पुढे सन १८५७ उगवले .क्रांतीचे संवत्सर हे
सकल हिंदुस्थान बळावले फिरंग्यांविरुद्ध .
झाशीच्या किल्यावरुन महालक्ष्मी क्रुद्ध होऊन कडाडली
मेरी झासी नही दुंगी !
आणी
सहस्त्रचंडी यागाच्या ज्वाळेतुन निघालेल्या ज्वालाप्रमाणे सहस्र दुर्गा सहस्त्र भैरव झाशी च्या किल्यावर लढण्यास सिद्ध झाले .
23मार्च१८५८ सर ह्युजच्या नेतृत्वाखाली इंग्रजी तोफा गडावर आग ओकु लागल्या .
रण तुंबळ माजले .
खाशी राणी लक्ष्मीबाईंनी पुरुषी वेशात शत्रुसैन्यात घुसुन धडक मारली नंतर परत किल्यात येत्या झाल्या .
झलकारी विजेसारखी लढत होती फिरंगी कापत होती
गुप्तहेरांचे जाळे व बातम्या अचुक पोचवत होती .
आणी घात झाला .
हिंदुस्थानचा अभिशाप फळास आला .फितुरी झाली. शत्रु किल्यात घुसू लागला .
झलकारीबाईनी दुलाजी ठाकुराची फितुरी राणीच्या कानी घातली
राणीने शेवटची बैठक घेतली ,खाशी मंडळी होती अंती झलकारीबाई बोलल्या
राणीचा वेश चढवुन मी किल्ला लढवावा .राणीने खाशा लोकांसहीत येथुन सुरक्षीत जागी जावे .आणी क्रांती कायम राखावी
जोपर्यंत झाशी स्वतंत्र होत नाही
ना मी शृंगार करेन नाही सिंदुर लावेल
हे जीवन स्वतंत्र्यासाठी .
राणी गहीवरलि परंतु रात्र वैर्याची समय असा अवघड पडलेला भावनांसाठी वेळ नव्हता राणी लक्ष्मीबाईंनी किल्ला सोडला परंतु महालक्ष्मी नसली तरी महाकाली अजुन किल्ल्याच्या तटावर अजुन होती
शेवट पर्यंत लढत राहुन शेवटी पकडली गेली .दुलाजीच्या माणसानी तिला ओळखले होते
लगेच तिने त्याच्यावर गोळी झाडली ,घोडा हलला आणी गोळी इंग्रज सैनिकास लागली या घटनेने ह्युज चिडला .
त्याने तिला कैद करुन पहार्यात ठेवले परंतु पिंजऱ्यात राहील ती वाघिण कसली
तीने पहार्यातुन सुटका करुन किल्याकडे पळ काढला
सकाळी ह्युज किल्यावरचे दृश्य पाहुन अवाक झाला .ते दांपत्य
पुरणचंद आणी झलकारीबाई तोफ लावत होते .
झटकन ह्युजने इशारा केला एक गोळी आली आणी पुरणचंद च्या छातीत लागली तो जागेवर गतप्राण झाला परंतु तरीही झलकारीबाई नी तोफ उडवली त्यात बरेच इंग्रज मेले अंती एका इंग्रजी तोफगोळा लागुन तिच्यादेहाचे तुकडे आणी रक्ताचा अभिषेक तिथेच किल्यावर झाला क्रांतीची विज भयंकर कडकडाट करुन अनंतात विलीन झाली .
बाजी©