एकटा राहीलो इथे,
आपले कुणी दिसेना
नभांतरीसुर्यासम
सोबती कुणी असेना
वाटा त्रासिणार्या
खणोन आज रोधिल्या
सावल्या भेडिणार्या
जाळोन राख केल्या
दिवास्वप्ने मनीची
छाटुन संपविली
नाती जळमटांची
काढुन फेकीयली
आता
जाळोनी अंग स्वतःचे
तेज जगा द्यावयचे
स्वःतेजाने आपुल्या
नंभांबर प्रकाशावयाचे
बाजी©
No comments:
Post a Comment