स्वप्नास पहाटे स्वप्न पडलेले
आज म्या पाहीले
स्मित ही अलगद लाजत हसलेले आज म्या पाहीले
आठवणींच्या साखळ्याही गुंतल्या आठवणीत कशाच्या
चांदण्यासवे बागडताना चांदरातीस म्या पाहीले
अलंकार, अनुप्रास
बाजी©
शोधतो आहे मि
माझ्या कवितेतील ती
तीच्यातील मि
अन माझ्या तील ति
शोधतो आहे मि माझ्या कवितेतील ती
मस्त मोकळ्या रानशिवारीचा वाराच आहे मि
पुष्पताटव्यातील गंधित लाजरी मंद झुळकच ती
प्रवाह माझा भलतातरी ती मिसळता गंधुन जातो
असाच मग मि माझ्यात तिजला सैरभर शोधतो
बाजी©
30-08-2018