Wednesday 16 January 2019

न हे नयन राधा

न हे नयन राधा राणी कृष्ण मेघ श्रावणीचे
हाती हे तुझे शशीवदन की फुल पंकजाचे
सावलीत लपाव्यात वेली असा केशसंभार
हा तनुगंध की कस्तुरीचा ग धुंदवितो फार

Sunday 6 January 2019

कोण तु

कोण तु अन् कोण मि
सवाल इथे हा नाही
आहोत का आपण एथे
कळतय का तुला काही

हातपाय आणि बुद्धी
आहेत इथे सर्वाना
जन्मामागिल कारण
तुझ्या विचार मनाला

पोट भरतोच आपण
रोज खाऊन दोन घास
यामधे कारण शोध
आयुष्य तरी काय ,दोन श्वास ?

Thursday 3 January 2019

पिडीतेच मनोगत

आयुष्य नावाच माझ स्वप्नं
अर्धवटच राहील आहे
पहाट होण्या आधीच भंगुन
सगळं काही उजाडलं आहे

फुलपाखराच्या कोशासारखी
माझीही काही स्वप्न होती
वेगळी काहीच नाही हो
ति तुमच्याच सारखी होती

सावरुन स्वतःस पुन्हा मि
स्वप्न मनात धरली होती
माझ्याच लोकांनी त्याची लक्तरे
वेशीवरती टांगली होती

सोडुन त्या नराधमाना
प्रत्येक प्रश्न उठला  माझ्यावर
लांछनाचा विषप्रयोग झाला
नकळत माझ्या मनावर

निघाली अंत्ययात्रा माझी जेव्हा
सर्वजण रडत होते
वेळ गेल्यावर आज सगळे
माझी किंमत समजत होते

बलात्कार केला राक्षसानी
परंतु समाज तो पिशाच्च ठरला
त्यानी फक्त शरिर लुटले
समाजाने तर खुन केला

पुरुषार्थाचे भाट सारे
आज लाजेने चुर झाले
रक्षिणारे हात जेव्हा
भक्षण्यास कामी आले

पुरुषार्थाचे गोडवे गाण्या
आता चांदभाट होणार नाही
स्त्रीलज्जा रक्षिणारे वीर
प्रताप शिवाजी होणार नाहीत

कारण

पुढारलेला समाज आजचा
विचाराने पांगळा आहे
21व्या शतकात राहुन
अवयवात अब्रु शोधत आहे

समाजमन गढूळ असल्यावर
मनाची पवित्रता कोण समजणार
आणी म्हणुनच
शरिर अत्याचाराच बळी ठरल्यावर
दोषी देखील मिच ठरणार.

बाजी©
omkarpandav.blogspot.com

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...