Wednesday, 23 September 2020

अजीजनबाई

आजीजन 

चाळ हुंकारे रण शृंगारे श्री स्वतंत्र्यतेच्या रागावर
अजीजन ज्वाला गेली चमकून सत्तावनच्या यागावर 

ठिकाण- बिठूर (कानपूर )
दिनांक- १७ अॉगस्ट १८५७

सांग तात्त्या आणी नाना साहेब कुठे आहेत ? 

 प्रचंड रागावलेल्या इंग्रज शिपायाने एका बेड्या ठोकलेल्या बाईच्या मानगुटीला धरुन दरडावून विचारले
 
 पण  कण्हण्याच्या अवाजा व्यतिरिक्त काही ही प्रतिसाद आला नाही
 काही क्षण गेले
मग शिपाई चिडला ,
अत्यंत क्रोधित होऊन मागे सरकला 
आणी सरररररकन कमरेचा पट्टा काढून जमिनीवर आपटला 
आपटला तसा एक 
फट्ट असा अवाज तंबूत घुमला 
अवाजासोबत तीने हालचाल केली 
 अंग आकसून घेतले अर्धनग्न असून ही पाठमोरी झाली पण बोलली नाही 
 ते पाहून शिपायाची तळपायाची आग मस्तकात गेली 
हे बघ रंडे 
आता जर सांगितलं नाहीस तर तुझी गोरी चमडी पट्याने उधडून काढेन 
शिपायाचा अवाज तंबूबाहेरच्या कोलाहलात ही वीज कडकावी तसा कडकला 
आणि एक क्षण निशब्द गेला ..
ती स्त्री निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखी उभी होती ,
अंग चोरुन अगदी केस अगदीच विस्कटलेले होते 
अंगावरील कपडे , कपडे म्हणून उरलेच नव्हते उरला होता नशिबासारखाच फाटका चिरुटा ,
 दिवसभरापासून चाललेल्या अत्याचारामुळे थरथरणार्या अंगावर जागोजागी जखमा झालेल्या होत्या ,
त्यात भर म्हणून कि काय तंबूतील गर्मीने घाम अंगावर मावत नव्हता 
आणी तसाच भळभळणार्या जखमांमध्ये जाऊन झिरपत होता 
जणु काय जखमावर नशिबचं मिठ चोळत होते 
तशी ती विव्हळत होती 
विव्हळत होती पण डगमगत नव्हती .
एक क्षण गेला आणी ती गरजली 

चमडी उधडली तरी सहन करेन पण  ईमान विकणार 
हसत हसत मरण स्विकारेन पण नाही मी गुलाम होणार नाही

हे ऐकून शिपाई आणखी चवताळला
एक पाऊल मागे गेला आणी दातओठ खात
हवे हात उंचावत
सपकन एक फटका तीच्या पाठिवर मारला 
मारला असा जीवाच्या आकांताने
 ती ओरडली , तडफडली 
 डोळे बाहेर आल्यासारखे वाटलं 
पाठिवरील कातडी उधडली गेली...

पैशासाठी शरीर विकणारी माझ्या सारख्या शिपायाला  गुलाम म्हणते काय ?
वेश्येने ईमानाच्या गोष्टी करायच्या नसतात !
      शिपाई ओरडला
पट्याच्या फटक्याहून अधिक काळीज चिरत गेले ते शब्द
वेश्येने ईमानाच्या गोष्टी करायच्या नसतात !
हा वार तिच्या शरीरावर नव्हता आत्म्यावर होता
तिच्या चरित्रावर होता , स्वाभिमानावर होता !

माणसात शारीरिक आघात सहन करण्याची शक्ती असते पण माणूस कधीच त्याच्या 
चरित्रावर ,स्वाभिमानावर झालेला आघात सहन करु शकत नाही 
परंतु बोलण्यासाठी अंगात त्राण उरलेला नव्हता 
तरी ही ती बोलली ,
तोंडातल्या तोंडातच ते ही 
ती म्हणाली 
मी दूर्दैवाने आणी परिस्थितीने वेश्या झाले 
चरितार्थासाठी शरीर विकले 
पण तुमच्या सारखी शरीर आणी आत्म्यासह परकियांची गुलामी केली नाही ...
 कि माझा स्वाभिमान पैशासाठी इंग्रजांच्या पायावर वाहिला नाही
 
 तीने बोलताना मोठा श्वास घेतला ..आता तिचा अवाज कापरा झाला होता तरी ही उसनं आवसान आणून ती पुढे बोलू लागली
 
 
माझे पाय मैफिल रंगविण्यासाठी थिरकले जरुर पण
हात कधी आपल्याच देशबांधवांच्या रक्ताने आपली मातृभूमी रंगविण्यासाठी उठले नाहीत
म्हणून ....तिचा श्वास जड होत होता  
तसा तसा अवाज क्षीण होत होता तरी ती बोलत होती 

म्हणून...जे पैशासाठी शरीर मन आत्म्याने
परकियांचे गुलाम होतात..
त् त् त्यानी व व वेश्येला न नाव ठेवू न नये
कसं बसं वाक्य पुर्ण केलं आणी तिची शुद्ध हरपली 

बेशुद्ध असताना तिला फरपटत सेनापती हँवलॉक समोर नेले गेले 
त्याने डोळ्यानेच शिपायाना आज्ञा केली 
शिपायांनी घडाभर गरम उकळलेले पाणी 
तीच्या अंगावर ओतले 
स्त्री म्हणून तीच्यावर दया करायला हँवलॉक काही भारतीय नव्हता 
बेसावध अंगावर वीज पडावी किंवा मासळी पाण्याबाहेर फेकल्यावर तडफडावी त्याहुन अधिक ती तडफडत होती 
पण तिथे उभ्या असणार्या कोणालाही तिच्याबद्दल किंचित ही दया उत्पन्न होत नव्हती 
होणार तरी कशी शरीर बाटलेल्याना एक वेळ 
जाग येते पण 
आत्मा विकणार्याना कसली जाग येणार होती ते देखिल शेवटी मुर्दाड मनाचे काळे इंग्रजच ना !
खूप वेळ जीवाची तडफड चालू होती 
ओरडणे चालू होते नुसता आकांत मांडला होता
तीने पण तिथे ....
पण हँवलॉक कडे वेळ नव्हता तो खुर्चीवरुन उठला 
काही पावले चालून टाचांवर तिच्यासमोर बसला आणी तिच्या विस्कटलेल्या केसात हात घालून तिच मुंडक गच्च पकडून एक जबर झटका देत तीचे तोंड वर केले आणी विचारला
तात्या आणी नाना कुठेय सांग 
शेवटच विचारतोय ....
....ती एक शब्द ही बोलली नाही
हँवलॉक चिडला 
सांग तात्या आणी नाना कुठेय
सांगितलस तर मी तुला जीवंत सोडेन 
बोल पटकन बोल पटकन बोल

हे ऐकून तीने हँवलॉक च्या डोळ्यात आपले थरथरणारे उघडझाप होणारे डोळे घातले 
..
.आणी एक चीड तिच्या तोंडावर उमटली तसच ती रक्तबंबाळ तोंडाने पचकन हँवलॉकच्या तोंडावर थूंकली 

आकस्मात झालेल्या या प्रकाराने तो भांबावला आणी प्रचंड चिडला 
या अपमानाने तो सेनापती वेडा पिसा झाला 
तळपायाची आग मस्तकात गेली 
सरररकन मागे सरकून तो उठला 
आणी आणी
कमरेची बंदूक काढून धाड धाड दोन गोळ्या तीच्या डोक्यात मारल्या 
आणी 
bloody whore !   अशी शिवी देत एका हातातील रुमालाने तोंड पुसले  

तीची तडफड कधीच बंद झाली होती 
मृत्यू ने शेवटी तीला स्वतंत्र्य केल होतं 
पण कोण होती ती ! 
एक वेश्या ,नर्तकी की आणखी कोणी
कसलं स्वतंत्र हवं होतं तीला 
शरीराच भांडवल करणारी ती स्त्री इतकी जीवावर उदार का झाली असावी ?
प्रश्न बरेच आहेत ? 
अशा प्रश्नांची उत्तरे भूतकाळाशिवाय कोण देऊ शकतो 
भूतकाळ कोणचा भूतकाळ ? तीचा भूतकाळ कि या देशाचा भूतकाळ ?
नक्की कोणाचा भूतकाळ ?
स्वतःसाठी वर्तमान जगणार्यांचा भूतकाळ ही त्यांच्यापुरताच मर्यादीत राहत असतो 
तसा 
देशासाठी जे वर्तमान जगतात नंतर त्यांचा भूतकाळ 
हा त्या देशाचा भूतकाळ बनतो आणी 
तो भूतकाळ जीवंत असतो , अमृत असतो
हे महान सत्य आहे 

Thursday, 3 September 2020

राहू दे

सगळ्यानाच आपलंस करणे, राहू दे
दरवेळी स्पष्टीकरण देणे, राहू दे
प्रत्येक वेळी सुरुवात करणे गरजेचे नाही
दरवेळी तुच माघार घेणे, राहू दे

नेहमी खळखळून हसणे राहू दे
कोणाजवळ नेहमी दुःख वाटणे,राहू दे
कोणाला ही कायम खांदा द्यावा का बरे
कोणाचा हात पकडून चालणे राहू दे

सगळेच प्रश्न सोडवणे ,राहू दे
गैरमजाची समजूत घालणे , राहू दे
कोणाकोणाची तोंड बंद करणार
प्रत्येकाला उत्तर देणे ,राहू दे 

तुटलेल्या नात्याना क्षमतेबाहेर जोडणे ,राहू दे
ताणलेल्या नात्याना ओढून धरणे,राहू दे
नात्यासाठी नेहमीच त्याग करायची गरज नाही
नात्यासाठी छातीवर घाव सोसणे , राहू दे



बाजी©

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...