Thursday, 3 September 2020

राहू दे

सगळ्यानाच आपलंस करणे, राहू दे
दरवेळी स्पष्टीकरण देणे, राहू दे
प्रत्येक वेळी सुरुवात करणे गरजेचे नाही
दरवेळी तुच माघार घेणे, राहू दे

नेहमी खळखळून हसणे राहू दे
कोणाजवळ नेहमी दुःख वाटणे,राहू दे
कोणाला ही कायम खांदा द्यावा का बरे
कोणाचा हात पकडून चालणे राहू दे

सगळेच प्रश्न सोडवणे ,राहू दे
गैरमजाची समजूत घालणे , राहू दे
कोणाकोणाची तोंड बंद करणार
प्रत्येकाला उत्तर देणे ,राहू दे 

तुटलेल्या नात्याना क्षमतेबाहेर जोडणे ,राहू दे
ताणलेल्या नात्याना ओढून धरणे,राहू दे
नात्यासाठी नेहमीच त्याग करायची गरज नाही
नात्यासाठी छातीवर घाव सोसणे , राहू दे



बाजी©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...