धर्मात, युद्धात, शौर्यात धैर्यात जो अग्रणी तो मराठा धनी
युद्वात आहे पुढे आपल्या कोण , पाहे मराठा न केव्हा तरी
हा आत्मविश्वास ऐसाच नाही, काळास तुम्ही विचारा तरी
दूर्दांत गर्विष्ठ हरवून युद्धात गर्वास चेंदून
आम्ही करी
आम्हीच रोखून आक्रंत कारी, किती मारले गाडलेले रणी
मृत्युवरी स्वार होतो मराठाच, मृत्युस मारीत जातो रणी
दिल्लीत गर्जून सिंहासनी श्री शिवाजी बनूनी आव्हानलो
औरंग अफजल्ल आलेत जे ही फाडून छातीवरी नाचलो
खिंडीत बाजी बनूनी यमालाच शंभू बनूनी कधी भांडलो
दर्यासही धाक लावी मराठाच अटकेस जिंकून जातो क्षणी
मृत्युवरी स्वार होतो मराठाच, मृत्युस मारीत जातो रणी
बाजी राधाकृष्ण पांडव copyright
No comments:
Post a Comment