आधाराशिवाय वाढलेली रोपटी पुढे अजस्त्र आकाराच फळाफुलांनी बहरुन कित्येका साठी आधार बनलेला वृक्ष बनत असला तरी काही रोपटी आधाराविणा जळताना ही पाहीली आहेत , खुंटताना पाहीली आहेत आणि दिशाहीन पणे वाढताना पाहीली आहेत .
फरक असतो जिद्दीचा ही जिद्दच असते ,
जगण्याची !
जी सक्षम बनविते जगण्यासाठी ,विचार देते प्रगतीसाठी आणि दिशा दाखविते वाढण्यासाठी
म्हणुन आधार नसलेल्या रोपट्याना स्वतःचा आधार स्वतःच बनुन आभाळाला आव्हान द्यायला जमतं
डोक्यावर आभाळ नसलेल्या पाखराना आपलं आभाळ स्वतःच निर्माण करायला जमत तर
अनाथाला स्वतःचा बाप स्वतः बनायला जमत !
तो अनाथ कधी आत्महत्या करत नाही ,
ते पाखरु कधी उडणे सोडत नाही की
ते रोपटे जगण्याची आशा सोडत नाही !
कमी वेळात आधार घेऊन वर चढलेली वेली काही दिवस आधारहिन संथ गतीने वाढणार्या रोपाला वाकुल्या दाखवितील ही परंतु एकदिवस तशा असंख्य वेलींचा आधार त्या झाडालाच बनावे लागते .
या खडतर प्रवासात तो नुसता शरिराने नाही तर मनाने ही मोठा झालेला दिसतो तर शरिरासोबत मन ही तितकेच अजस्र मोठे आणि सर्वसमावेशक
मोकळे बनलेले असते .ही मोठी देणं त्या अनाथास मिळालेली असते जी
त्यामार्गावरुन जाणार्या प्रत्येक वाटसरुस नियतीने शिदोरी स्वरुप आयुष्यभर पुरेल इतकी बांधलेली असते ,
आणि तो वाटसरु ही तिच्या शी वचनबद्ध असतो की ही शिदोरी "माझ्यां" 'साठीच असेल अंतस्थः ते "माझे" म्हणजे सर्व जगच तो समजत असतो
ही मनाची विशालता त्यावर त्या प्रवासातच भाळलेली असते ...
बाजी©