Friday, 22 June 2018

आज उजळली

आज उजळली घोर रात्र
तु नभांगणी येता
विसरला चंद्र नक्षत्रास
तुझे रुप पाहता
परावर्त चंद्रकिरणासम
तुजमुखाची प्रभा
त्या दाक्षायणी हरवल्या
हे लावण्य तुझे पाहता

हातांत लाजुन चेहरा
तु असा लपविलेला
गोड गुलाबी गुलाब
जसा कळीत लपलेला

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...