Friday 9 November 2018

नदी आणि जीवनप्रवाह

जीवन एक प्रवाह आहे  नदीसारखाच अगदी ज्यात कोणासाठी ,कशासाठी  थांबणे शक्य नसते अगदी मृत्युच्या महासागरास मिळेपर्यंत तरी  नाहीच
जीवनप्रवाहामध्ये वाहुनही एखाद्या अलग दिशेस  विलगपणे वाहणार्या जीवनास या प्रचंड एकदिशाप्रवाहीत  प्रवाहाविरुद्ध वहायचे असते तेव्हा तो एकटा पडतो  तरीही सतत त्या प्रवाहास धक्कै देत राहतो कारण त्याची दिशा हेच त्याच्या जीवनाच ध्येय असते ,शेवटी
दिशा हीच जीवनध्येय आहे मग ती पाण्याची असो वा मानवी जीवनाची .
आयुष्यातील बर्याच सत्यांची जाणीव ही निसर्गात आल्यावर होते बाकी   .
माणसाच्या गर्दीत ही आपण एकटे असतो आणि निसर्गाच्या एकांतात ही एक बोलकेपणा असतो. मानवी गर्दीतील शांततेत तुम्हाला कधी मनःशांती मिळत नाही ती निसर्गाच्या  कोलाहलात नक्कीच असते अखंड प्रवाह आणि शिलाखंडांचे जेथे नित्य संगर चालु असेल त्या गोंगाटात
  आणि नित्य जेथे नभधरणीची रतिक्रिडा चालते त्या सदाहरित वनातील  शांतता अगदी तेथील असंय अगणित  आणि नित्य जीवनसंघर्षा मधुन ही  जाणवतेच नं परंतु माणसाच्या कृत्रिम शांततेत ही किती गोंगाट असतो ,
स्वार्थादी राग,लोभ आणि अहंकाराचा,हा गोगाट तिकडे नदीकाठी कधीच नसतो 
तेथील प्रवाहात,जलतुषारात लपलेली असतात सत्ये आणि माणवास ती सत्ये उमजावणारी समजाविणारी एक जादु, जादु!
हो जादुच!कारण आम्हाला तेथे गैल्यावर जीवनसत्ये समजतात जी अनादी आहेत ,चार क्षण स्वत्व विसरुन बसल्यावर 
आपल्या जिविताची कारणे समजतात  ,ही सत्ये का आम्हास पुर्वी माहीती नव्हती  असे कधीच नव्हते  परंतु मग उमजत का नव्हती ?
तर  या दोन्ही गोष्टींमध्ये होता पडदा  ,पडदा?
अहंकाराचा,लोभाचा ,मायेचा  तो एथे या ठिकाणी येतान गळुन पळुन पडलेला आणि तो टाकुन जोव्हा आपण  निसर्गात जातो  तेव्हा आई प्रमाणे ती नदी आपणास हे सर्व समझिविते,उमजविते आणि म्हणुन ते आपल्याला पटते ही .
दोन विरुद्ध दिशाप्रवाह,खनिज धातुकण आणि वायुसमवेत पंच महाभुतादी मिश्रणातुन जसे 
जीवन निर्माण होते याचे साम्य मला दोन  सुक्ष्मप्रवाहाच्या भिडण्यातुन निर्माण झालेल्या फेसाप्रमाणे भासते  परचंड निसर्गप्रवाहाच्या  कालचरात  ज्याप्रमाणे या फेसाचे आस्तित्व काही क्षणमात्र असते  तसेच या शरिराचे आहे  बस कर्मवैविध्यातुन हे आपल्या जीविताची वेगळी छाप सोडुन जातात
शेवटी  दिशा कोणतीही असो ,ध्येय काहीही असो ,ते तुम्ही ठरवा अथवा ठरवु ही नका निसर्गपुरुषाने कालचक्राशी संधी करुन या जीवनप्रवाहास एक ध्येय  जन्मतः दिलेले आहे ते म्हणजे मृत्यु
इथे ही हा प्रवास थांबत नाही बस्स मृत्यु हेच ते ठिकाण आहे  जेथुन पुर्वजीवनाची दिशा बदलते  पुन्हा फिरुन इथेच येण्याकरिता  जीवनचक्र ही एक जलचक्रासारखै आहे नाही का

बाजी©
०९०.८.२०१८

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...