Tuesday, 13 November 2018

सहजा नभ भुवरी

सहजा उतरले नभ भुवरी
झालेच नं  मिलन तयांचे
पसरल्या नक्षत्र चांदण्या
नव्हे रे दवबिंदु तृणाते

अग पहाटे  इतक्या का
घाईत निघुन जातेस
तुज्या घाईने तयांचे
बोलणे अर्धवट राहते

युगलोटावे तैसे दिन
हळुवार सरकत जातो
सोबत भेटीची तिच्या
उत्कंठा वाढवित नेतो

मग हळुवार नभमनी
ती रात्र उतरत जाते
मनी नभाच्या कसली
स्वप्नांची गर्दी होते

तळमळत नभ भुप्रियेला
हळुवार साद घालतो
शीतलफुंकर घालुन तिचे
अंग शहारुन जातो

इतक्यात अलवार कशी
रात्र निघोन जाते
मग  नभ भुवरी अलगद
नक्षत्रासह येते

रोज रोज दो क्षणांची ही
भेट नशिबी तयांच्या
तरीच जन्मांतरीची 
नात्यात गोडी तयांच्या

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...