Thursday 27 December 2018

छेडोन गेल्या तारका

छेडुन गेल्या तारका,मन सतार हलकेच ही
तुला आठविले सखे,सहजची मनघनातुनी

सहजची मि सोडले ,बंध भावनांचे खुले
धुके आठवांचे गेले ,तन मन शहारुनी 

शहारल्या मना छेडतो,मंदगंधित द्वाड वारा
भास वार्याचाच  की,उष्ण श्वास तुझा हा

त्या श्वासाचा गंध ,नशाच मज चढवितो
अन खुळ्या मना माझ्या,तुजप्रती वेडावितो

वेडावल्या मनी मग,घोंगावती आठवणी
मन श्वास संथ होतो,भेट पहीली आठवितो

आठविता मग माझा,हृदय नाद संथ होतो
एकएक हृदयतंतु मग,हळुवार शांत होतो

छेडुन गेल्या तारका ...

बाजी©

येशील का सखे पुन्हा

येशील का सखे पुन्हा त्याच जीवन वळणावरी
त्याच भावबंधांच्या  त्याच किनार्यावरी
येशील का सखे पुन्हा मन मोहक क्षितिजावरी
त्याच नभधरणी च्या त्याच त्या प्रणयस्थली

येशील का सखे पुन्हा त्या फुलाच्या गंधकोषी
त्याचसुख मकरंदाच्या त्या अत्तर कुपीपाशी
येशील का सखे सोबती  दुःखसागराच्या तळाशी
सोबतीने तैरताना तरुन जाऊ शेवटासी
येशील का सखे पुन्हा ....
बाजी©

Wednesday 19 December 2018

आठवणींच्या धुक्यात

आठवणींच्या धुक्यात सखये मन असे शहारले
घैऊन दुलई कालाची तुझ्या आठवणीत निजले
अजुनी ताजी  फुलांसारखी पहीली भेट आठवली
नजर मनाची त्या रस्त्यावर ,त्या फाटकावर विसावली
हटवुनी  ताटवा आतुन कोणी वनमाला जणु आली
तशी तुझी ती गोड साजरी छटा मना भावली
पाहुनी मजला जणु वनराणी विरल्यागत हे झाले
काळ वेळ अन भान स्वतःचे तुज पाहता हरवले
आठवते  झुकलेली नजर ती जेव्हा मी पाहीली
हृदयी माझ्या  प्राजक्त पुष्पांची वर्षा जणु झाली
त्या वेळेला त्या छबीला मी हृदयात असे  मांडले
त्या दिवसाच्या त्या भेटीला हृदयातची कोंडले
तो पावेते हृदय माझे अकारणची धडकले
मग त्याला ही धडकण्याने कारण सहज मिळाले

Sunday 16 December 2018

प्रतिक्षा

हृदयातील स्वप्नांस प्रतिक्षा आहे
निर्जन वाटे ची 
निर्फेन लाटेची ,सुगंधीत काट्यांची
प्रेमदायी नात्यांची,सुरमयी दुःखांची
रंगमयी रातींची ,निर्व्याज प्रीतिची
परंतु या कल्पनातीत स्वप्नात
वाट पाहणारे हृदयास डोळे नाहीत,ते अंध आहे जन्मापासुन अगदी
आणि म्हणुनच की काय ते 
हे नेत्र ,ही लोचने ही असली
असली स्वप्ने पाहत नाहीत ,
असल्या अपेक्षा करत नाहीत असे हिरमुसुन ही जात नाहीत
दुःखाच्या त्रासाच्या गर्तेत डुंबत नाहीत परंतु
न जाणो का
तरीही प्रत्येक रात्री ती लवकर दमतात ,थकतात,
मिटतात हृदय मात्र चालुच असते
कायम अव्याहत अखंड
त्याची स्वप्ने  उरात घैऊन , कदाचित
प्रत्येक वेळी ही नेत्रे ह्या बुद्धी करवी या हृदयास सांगुन सांगुन सांगुन,सत्यअसत्याची जाणीव करुन देता देता थकुन जातात रंतु हे हृदय मोठे हट्टी वाटते ते कधीही ऐकत नाही ,ते म्हणजे स्किझैफ्रेनियाच्या रुग्णासारखै आपल्याच धुंदीत ,नादात ,तालात  नाचत असते उड्या मारत असते
शेवटी हताश होऊन ही नेत्रे ही गात्रे ही बुद्धी थकुन जाते
आणि आपण झोपतो
मात्र हृदय तरीही धडधडत असते
जीवंतपणाची जाणीव करुन देण्यासाठी अगदी दररोज

बाजी©

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...