येशील का सखे पुन्हा त्याच जीवन वळणावरी
त्याच भावबंधांच्या त्याच किनार्यावरी
येशील का सखे पुन्हा मन मोहक क्षितिजावरी
त्याच नभधरणी च्या त्याच त्या प्रणयस्थली
येशील का सखे पुन्हा त्या फुलाच्या गंधकोषी
त्याचसुख मकरंदाच्या त्या अत्तर कुपीपाशी
येशील का सखे सोबती दुःखसागराच्या तळाशी
सोबतीने तैरताना तरुन जाऊ शेवटासी
येशील का सखे पुन्हा ....
बाजी©
No comments:
Post a Comment