Wednesday, 19 December 2018

आठवणींच्या धुक्यात

आठवणींच्या धुक्यात सखये मन असे शहारले
घैऊन दुलई कालाची तुझ्या आठवणीत निजले
अजुनी ताजी  फुलांसारखी पहीली भेट आठवली
नजर मनाची त्या रस्त्यावर ,त्या फाटकावर विसावली
हटवुनी  ताटवा आतुन कोणी वनमाला जणु आली
तशी तुझी ती गोड साजरी छटा मना भावली
पाहुनी मजला जणु वनराणी विरल्यागत हे झाले
काळ वेळ अन भान स्वतःचे तुज पाहता हरवले
आठवते  झुकलेली नजर ती जेव्हा मी पाहीली
हृदयी माझ्या  प्राजक्त पुष्पांची वर्षा जणु झाली
त्या वेळेला त्या छबीला मी हृदयात असे  मांडले
त्या दिवसाच्या त्या भेटीला हृदयातची कोंडले
तो पावेते हृदय माझे अकारणची धडकले
मग त्याला ही धडकण्याने कारण सहज मिळाले

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...