हृदयातील स्वप्नांस प्रतिक्षा आहे
निर्जन वाटे ची
निर्फेन लाटेची ,सुगंधीत काट्यांची
प्रेमदायी नात्यांची,सुरमयी दुःखांची
रंगमयी रातींची ,निर्व्याज प्रीतिची
परंतु या कल्पनातीत स्वप्नात
वाट पाहणारे हृदयास डोळे नाहीत,ते अंध आहे जन्मापासुन अगदी
आणि म्हणुनच की काय ते
हे नेत्र ,ही लोचने ही असली
असली स्वप्ने पाहत नाहीत ,
असल्या अपेक्षा करत नाहीत असे हिरमुसुन ही जात नाहीत
दुःखाच्या त्रासाच्या गर्तेत डुंबत नाहीत परंतु
न जाणो का
तरीही प्रत्येक रात्री ती लवकर दमतात ,थकतात,
मिटतात हृदय मात्र चालुच असते
कायम अव्याहत अखंड
त्याची स्वप्ने उरात घैऊन , कदाचित
प्रत्येक वेळी ही नेत्रे ह्या बुद्धी करवी या हृदयास सांगुन सांगुन सांगुन,सत्यअसत्याची जाणीव करुन देता देता थकुन जातात रंतु हे हृदय मोठे हट्टी वाटते ते कधीही ऐकत नाही ,ते म्हणजे स्किझैफ्रेनियाच्या रुग्णासारखै आपल्याच धुंदीत ,नादात ,तालात नाचत असते उड्या मारत असते
शेवटी हताश होऊन ही नेत्रे ही गात्रे ही बुद्धी थकुन जाते
आणि आपण झोपतो
मात्र हृदय तरीही धडधडत असते
जीवंतपणाची जाणीव करुन देण्यासाठी अगदी दररोज
बाजी©
No comments:
Post a Comment