अंकासोबत
जीवनानाट्यात पात्र बदलत गेले
नट तोच राहीला मंच बदलत गेले
काळासोबत
जीवनप्रवाहात रंग बदलत गेले
पक्षी तोच राहीला,पंख बदलत गेले
दिशेंसोबत,
जीवनकालात वारे बदलत गेले
ऋतु तोच राहीला दिन बदलत गेले
बाजी
अंकासोबत
जीवनानाट्यात पात्र बदलत गेले
नट तोच राहीला मंच बदलत गेले
काळासोबत
जीवनप्रवाहात रंग बदलत गेले
पक्षी तोच राहीला,पंख बदलत गेले
दिशेंसोबत,
जीवनकालात वारे बदलत गेले
ऋतु तोच राहीला दिन बदलत गेले
बाजी
पापण्यावर घेऊन पहाटस्वप्ने मनपाती धुंद होती
झाली भेट दवबिंदुंची पण
पहाट सरली होती
दो क्षणांच्या सोबतीची आस ,तरीच
पाती रात्रभर जागीच होती
बाजी
तुला वहायच अगदी न थांबता ,
ते सर्व जे तुझ्यावर अवलंबुन आहेत त्यांकरिता
तुला स्वःतच आस्तित्व अदृश्य करुन
कर्म करायचय दुसर्यांसाठी,
श्वास भरायचाय त्यांच्या जीवनात
म्हणुन
तुला शोकगीते गात एका जागी थांबण्याचा अधिकार नाही
त्या वार्याकडनं शिक काही...!
बाजी©
गाव जेव्हा दिसु लागले रात्र केव्हाच सरली होती
स्वप्नगावीच्या शोधात काट्यांचीच सोबत होती
पोचता कळावे गाव तेच पण उशीर झाला होता
रात्रभरात गाव लूटुन आज विधुर झाला होता
चाचपडत काढलेल्या रस्त्यावर फुलेच बस्स उरली होती
खुडलेली काटीही माझ्या मनास मोठा आधार वाटत होती
दाटल्या अंधारात लख्खपणे सगळा गाव जळत होता
उरात घेऊन पाणी मधेच तलाव मात्र हसत होता
होते पाणी जरी कोणी विझविण्यास आले नाही
जळालेल्या जखमेवर कोणी फुंकर साधी घातली नाही
काल सकाळी हा गाव ज्याना आपलं म्हणत होता
दुसर्या पहाटे जळाल्यावर,त्याना गाव सोडताना पाहत होता
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...