Sunday, 7 April 2019

जेव्हा गाव दिसु लागला

गाव जेव्हा दिसु लागले रात्र केव्हाच सरली होती
स्वप्नगावीच्या शोधात  काट्यांचीच सोबत होती

पोचता कळावे गाव तेच पण उशीर झाला होता
रात्रभरात  गाव लूटुन आज विधुर झाला होता

चाचपडत काढलेल्या रस्त्यावर फुलेच बस्स उरली होती
खुडलेली काटीही माझ्या मनास मोठा आधार वाटत होती

दाटल्या अंधारात लख्खपणे सगळा गाव जळत होता
उरात घेऊन पाणी मधेच तलाव मात्र हसत होता

होते पाणी जरी कोणी विझविण्यास आले नाही
जळालेल्या जखमेवर कोणी फुंकर साधी घातली नाही

काल सकाळी हा गाव ज्याना आपलं म्हणत होता
दुसर्या पहाटे जळाल्यावर,त्याना गाव सोडताना पाहत होता

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...