Sunday, 30 June 2019

जीवनवाटेवर 2

पुर्ण वाचा !

जिवनवाटेवर मला , मेघ भेटतात !
उरात फक्त पाणी घेऊन फिरणारे,
ज्याना आपल कुट्टपणे भरलेल दुःख असतं, समुद्रापासन विलग होण्याचं , हवेचा झोक नेईन तिथे भटकण्याचं !
आयुष्यात असतो एकटेपण ,ना नशिबी स्थिरता ,
परंतु तरीही हे मेघ बरसने सोडत नाहीत
,वसुंधरेस आपल्या सरीनी भिजविने कि जगास फुलविने सोडत नाहीत
पुर्ण पणे बरसताना आपलं आस्तित्व ही उधळुन टाकतात जगावरं ,आणि खुलवितात त्यांच जीवनं
या सगळ्या दिशाहिन जीवनप्रवासात आपलं आस्तीत्व सतत बदलुन ही ते आपल ध्येय मात्र विसरत नाहीत अनेक ओहोळांद्वारे कुठेतरी नदीत एकत्र होऊन समुद्रास मिळतातच ,
आपल्या जीवनात ही असेच असावे नाही का ?
आयुष्याच्या वाटेवर आपण कितीही भरकटलो  ,कितीही जबाबदार्यांच्या ओझ्याखाली झुकून मार्गहिनपणे भटकताना जरी आपलं आस्तित्व हरवलो तरीही अंतःकरणाच्या एका कोन्यात आपली ध्येयज्योती कायम हातांचा कोनाडा करुन राखावी अन योग वेळ येताच त्या ध्येयप्राप्तीत जिद्द बनोन रस्ता प्रकाशावी ,काही मार्ग चुकले म्हणजे ध्येय गाठता येत नाही हे पुर्ण सत्य नाहीच हे ,मेघांच ऐकुन आयुष्य वाट मि चालु लागतो ..

भेट शेवटची

भेट शेवटची काही गोष्टी बोलता बोलता राहील्या
मनातनं उतरुन मग पुढे डोळ्यातनं वाहील्या

पावला गणिक थेंब टपकन हातावरती पडले
उबदार स्पर्श आश्रुंचा अन  सगळे अंग शहारले

मि फिरलो पाठीमागे  दिशाच जणु फिरली
माझीच सावली मजपासुन दुर जावु लागली
बरसत होता बाहेर श्रावण जग बहरुन गेले होते

दुनियेस बेखबर मनवन माझे वणव्यात जळाले
सुन्या रातीत बसल्यावर  बस एकटेपण जाणवले

पत्र शेवटचे,कविताही ,ओळी लिहीता लिहीता राहील्या
आपल्या कहाणीसारख्या लिफाफ्यात अर्धवटच राहील्या

Saturday, 29 June 2019

जीवन रस्त्यावर

आयुष्यात काही मित्र भेटतात निखळ अगदी
डोंगर माथ्यावरनं वाहत येऊन वाटेवर भेटणार्या ओहोळा प्रमाणे ,
आपल्या निखळ स्वभावाने आनंद देणारे ,
वाहत्या पाण्याच्या खळखळी प्रमाणे सुखद आठवणी ठेवुन
दोन क्षणात जीवन रस्त्यात मागे पडुन ही जातात , मनात कायम साठी आठवणी ठेवुन !

जीवन रस्त्यावर....

Friday, 21 June 2019

लाजला चंद्र ही

उमलता चाफा पाहुनी लाजला चंद्र ही
ती चूक चंद्राची मुळीच नव्हती
दरवळत्या गंधकोशास भुलला भ्रमर ही
ती चूक भुंग्यांची मुळीच नव्हती

बरसला प्राजक्त प्रेमांध तृणशय्येवरी
ती चूक वार्याची मुळीच नव्हती
गंधसौरभाने मोडली झोप पहाटे कधी
ती चूक स्वप्नांची मुळीच नव्हती

भावनेच्या मनी जागले प्रेम निद्रेतही
ती चूक  डोळ्यांची मुळीच नव्हती
गोठल्या भावनाही झडल्या दव बनोनी
चूक गारव्याची मुळीच नव्हती

Baaji

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...