उमलता चाफा पाहुनी लाजला चंद्र ही
ती चूक चंद्राची मुळीच नव्हती
दरवळत्या गंधकोशास भुलला भ्रमर ही
ती चूक भुंग्यांची मुळीच नव्हती
बरसला प्राजक्त प्रेमांध तृणशय्येवरी
ती चूक वार्याची मुळीच नव्हती
गंधसौरभाने मोडली झोप पहाटे कधी
ती चूक स्वप्नांची मुळीच नव्हती
भावनेच्या मनी जागले प्रेम निद्रेतही
ती चूक डोळ्यांची मुळीच नव्हती
गोठल्या भावनाही झडल्या दव बनोनी
चूक गारव्याची मुळीच नव्हती
Baaji
No comments:
Post a Comment