भेट शेवटची काही गोष्टी बोलता बोलता राहील्या
मनातनं उतरुन मग पुढे डोळ्यातनं वाहील्या
पावला गणिक थेंब टपकन हातावरती पडले
उबदार स्पर्श आश्रुंचा अन सगळे अंग शहारले
मि फिरलो पाठीमागे दिशाच जणु फिरली
माझीच सावली मजपासुन दुर जावु लागली
बरसत होता बाहेर श्रावण जग बहरुन गेले होते
दुनियेस बेखबर मनवन माझे वणव्यात जळाले
सुन्या रातीत बसल्यावर बस एकटेपण जाणवले
पत्र शेवटचे,कविताही ,ओळी लिहीता लिहीता राहील्या
आपल्या कहाणीसारख्या लिफाफ्यात अर्धवटच राहील्या
No comments:
Post a Comment