Friday 12 July 2019

वारी

वारी पंढरपूराची
भेट माहेरची जणू
पाहता भुवैकूंठास
होतो आनंद थोरसा

नाचती खेळती तीरी
घेवुनी टाळ हे करी
आकाशात पताका नी
सुर्य झाकोळला बघा

ऐसा ब्रह्मानंदाचा हा
नसे अन्यत्र सोहळा
भरतो पैलतीरी ह्या
सकलसंत सं मेळा

पवित्र मास आषाढी
वैष्णव पुण्यतीर्थी
हरतात पापे येथे
चंद्रभागेत नाहता

अनुष्टुभ

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...